'राहुल गांधींनी अगोदर मेव्हण्याला कुर्ता पायजमा घालून दाखवावा'

मोदी सरकारला 'सूट-बूट वालं सरकार' म्हणून हिणवणाऱ्या राहुल गांधींवर आता भाजपनं पलटवार केलाय. 

Updated: Aug 20, 2015, 03:37 PM IST
'राहुल गांधींनी अगोदर मेव्हण्याला कुर्ता पायजमा घालून दाखवावा' title=

नवी दिल्ली : मोदी सरकारला 'सूट-बूट वालं सरकार' म्हणून हिणवणाऱ्या राहुल गांधींवर आता भाजपनं पलटवार केलाय. 

मंगळवारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत 'सूट-बूटवालं सरकार' नाही तर सामान्य माणसासाठी काम करणाऱ्या 'कुर्ता - पायजमा सरकार' तयार करण्याचं आश्वासन दिलं होतं. 

यावर, राहुल गांधींनी अगोदर आपल्या मेव्हण्याला म्हणजेच रॉबर्ट वडेरा यांना कुर्ता-पायजमा घालून दाखवावा, असं आव्हानं भाजपचे पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी देत राहुल गांधींवर पलटवार केलाय. 

रायबरेली स्थित राजीव गांधी पेट्रोलियम इन्सिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीच्या पहिल्या दिक्षांत सोहळ्यात प्रधान सहभागी झाले होते. यूपीए सरकारनं आयआयटीच्या धर्तीवर या संस्थेचा पाया रचला होता पण, सात वर्ष उलटल्यानंतरही या संस्थेची स्वत:ची जागा नाहीए, असा टोलाही प्रधान यांनी यावेळी हाणला. 

राजीव गांधी पेट्रोलियम इन्सिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीची सुरुवात 2008 साली भाड्यानं घेतलेल्या परिसरात झाली होती. सुरुवातील एमबीए आणि पीएचडीशिवाय इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम सुरु करण्यात आला. परंतु, या वर्षापासून एमबीएचा अभ्यासक्रम बंद करण्यात येतोय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

 

 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x