भाजप उमेदवार माजी क्रिकेटर श्रीसंतची सोशल मीडियावर खिल्ली...केरळ पाहा काय म्हटलं?

केरळ राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यात. प्रचारात जोरदार रंगत येत आहे. भाजपने आपली ताकद लावलेय. 

Updated: Apr 20, 2016, 06:04 PM IST
भाजप उमेदवार माजी क्रिकेटर श्रीसंतची सोशल मीडियावर खिल्ली...केरळ पाहा काय म्हटलं? title=

मुंबई : केरळ राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यात. प्रचारात जोरदार रंगत येत आहे. भाजपने आपली ताकद लावलेय. मात्र, वादग्रस्त क्रिकेटपटू श्रीसंत याला भाजपने उमेदवारी दिलेय. आज या उमेदवाराची सोशल मीडियाव खिल्ली उडवली जातेय. त्याने केरळला सिटी संबोधले. 

भूगोल माहीत नाही का?

केरळ हे राज्य आहे, हे भाजप उमेदवाराला माहीत नाही का?, असा सवाल ट्विटरच्या यूजर्सनी विचारलाय. श्रीसंतने चुकीने केरळला शहर संबोधले. मात्र, सोशल मीडियावर यावर संताप व्यक्त होत असताना त्याची खिल्लीही उडवली जातेय. ट्विटरवर पोस्ट टाकल्यानंतर भाजप उमेदवाराला भूगोल माहीत नाही का, असा सवाल यूजर्सने विचारत टीका केलेय.

स्पॉट फिक्सिंग

श्रीसंत तिरुवनंतपूरममधून भाजपचा तिकिटावर निवडणूक लढत आहे. दरम्यान, श्रीसंतने ट्विटरवर खुलासा केलाय. श्रीसंत आयपीएल स्पॉट फिक्सिंगचे आरोप झाल्यानंतर त्याचे क्रिकेट करिअर संपले. त्यानंतर तो आता राजकारणात उतरलाय.