www.24taas.com, झी मीडिया, राजकोट
करा सेवा, मिळणार मेवा अशा म्हणीचा प्रत्यय गुजरातमध्ये पाहायला मिळाला आहे. काँग्रेसच्या एका नेत्याने आपली ६०० कोटींची मालमत्ता आपल्या नोकराच्या नावावर केली आहे.
गजराज सिंह जडेजा नावाच्या कोट्यधीश काँग्रेस नेत्याचे गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात निधन झाले. ३ महिन्यानंतर स्पष्ट झाले की, गजराज सिंह यांनी आपली ६०० कोटींची मालमत्ता मृत्यूपत्रात आपला नोकर वीनू भाई याच्या नावावर केल आहे. वीनू हे ४० वर्षांपासून गजराज सिंह यांच्या घरी काम करीत होते. जडेजाला एकही मूल नव्हते, त्यामुळे त्यांनी आपली संपूर्ण संपत्ती वीनू भाई यांच्या नावावर केली.
यात २६० बिघे जमीन, अनेक फ्लॅट, कोट्यवधी रुपयांचे शेअर्स आणि एफडी यांच्यावर आता वीनू भाई यांचा हक्क असणार आहे. जसे मृत्यूपत्र समोर आले तसे जडेजा यांच्या परिवाराने नोकर वीनू भाईच्या परिवाराला बंधक बनविले. पोलिसांनी वीनू भाई आणि त्याच्या परिवाराला शोधले आणि त्यांची सुटका केली. कोट्यधीश झालेल्या वीनू भाईने सुटल्यानंतर सांगितले की, सुरूवातीला गजराज यांच्या चुलत भाऊ आणि त्याच्या कुटुंबियाने आम्हांला धमकावले. आम्हांला अंदाजा नव्हता की ते आम्हांला बंधक बनवतील.
गजराज यांना वाटले होते की, त्यांच्या मृत्यूनंतर प्रॉपर्टीवरून त्यांच्या कुटुंबात वाद निर्माण होतील. त्यामुळे त्यांनी मृत्यूपत्र बनवून ठेवले होते. गजराज यांची वीनू भाईशी ओळख ४० वर्षांपूर्वी झाली होती. गजराज यांनी वीनू यांचे लग्न करून दिले होते. त्यांच्या मुलांना राजकोट येथील चांगल्या शाळेत प्रवेश मिळवून दिला. तसेच शिक्षणासाठी त्या मुलांना परदेशातही पाठवले. शेती करणाऱ्या जडेजांनी नंतर प्रॉपर्टीचा व्यवसाय करून कोट्यवधीची संपत्ती जमा केली होती.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.