बाबा गुरमीत राम रहीम अडचणीत, विष्णूरुपातला व्हिडिओ झाला वायरल

मोहाली : कॉमेडी नाईटस मधील किकू शारदाच्या अटकेनंतर पुन्हा चर्चेत आलेले डेरा सच्चा सौदाचे स्वयंघोषित धर्मगुरू बाबा गुरमीत राम रहीम हे पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता आहे.   

Updated: Jan 17, 2016, 03:53 PM IST
बाबा गुरमीत राम रहीम अडचणीत, विष्णूरुपातला व्हिडिओ झाला वायरल title=

मोहाली : कॉमेडी नाईटस मधील किकू शारदाच्या अटकेनंतर पुन्हा चर्चेत आलेले डेरा सच्चा सौदाचे स्वयंघोषित धर्मगुरू बाबा गुरमीत राम रहीम हे पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता आहे. 

भगवान विष्णूंच्या अवतारातील राम रहीम यांचा व्हिडीओ व्हायरल झालाय. याप्रकरणी मोहाली इथल्या झीरकपूर पोलिस स्थानकात त्यांच्याविरूद्ध धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 'ऑल इंडिया हिंदू फेडरेशन'च्या निशांत शर्मांनी हा गुन्हा नोंदवला आहे. 

याआधीही शिखांचे दहावे गुरू असलेल्या श्री गोविंदसिंगांचा वेष परिधान केल्याने पंजाबात वातावरण तापले होते. तेव्हाही त्यांच्याविरूद्ध धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा ते वादात सापडलेत.