ट्विटरवर मोदींनी किंग खानलाही टाकलं मागे

मुंबई : सोशल मिडीयावर अॅक्टिव्ह असणारे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर बॉलीवूडचा किंग शाहरूख खानलाही मागे टाकलंय

Updated: Jan 17, 2016, 02:53 PM IST
ट्विटरवर मोदींनी किंग खानलाही टाकलं मागे title=

मुंबई : सोशल मिडीयावर अॅक्टिव्ह असणारे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर बॉलीवूडचा किंग शाहरूख खानलाही मागे टाकलंय. सर्वाधिक ट्वीटर फॉलोअर्स मिळवणाऱ्या भारतीयांच्या यादीत त्यांनी दुसरा क्रमांक पटकावलाय.

नरेंद्र मोदी २००९ सालापासून ट्विटर वापरत आले आहेत. पण भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार झाल्यापासून त्यांच्या ट्विटर फॉलोअर्सची संख्या कमालीची वाढली आहे. गेल्या काही महिन्यांपासून दर दोन महिन्यांला सरासरी नव्या फॉलोअर्सची संख्या दहा लाख इतकी आहे. 

सध्या मोदी यांच्या फॉलोअर्सची संख्या १,७३,८२,७८४ तर किंग खानच्या फॉलोअर्सची संख्या १,७३,६२,५०५ इतकी आहे. पण, ट्विटरवर भारतात अमिताभ बच्चन यांचे सर्वात जास्त म्हणजे जवळपास १० कोटी ९० लाख फॉलोअर्स आहेत.

नरेंद्र मोदी जगभरातही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांनंतर सर्वाधिक फॉलोअर्स असणारे दुसऱ्या क्रमांकाचे नेते आहेत.