1993नंतरचे कोळसा खाणवाटप बेकायदा, सुप्रीम कोर्टाचा निर्णय

१९९३ नंतरचे सगळे कोळसा खाण वाटप आज सुप्रीम कोर्टानं रद्द केले आहेत. या वाटपामध्ये कुठलेही निकष पाळले नसल्याचा आणि मनमानीपणे खाण वाटप झाल्याचे ताशेरे सुप्रीम कोर्टानं ओढले आहेत.

Updated: Aug 25, 2014, 03:14 PM IST
1993नंतरचे कोळसा खाणवाटप बेकायदा, सुप्रीम कोर्टाचा निर्णय title=

नवी दिल्ली: १९९३ नंतरचे सगळे कोळसा खाण वाटप आज सुप्रीम कोर्टानं रद्द केले आहेत. या वाटपामध्ये कुठलेही निकष पाळले नसल्याचा आणि मनमानीपणे खाण वाटप झाल्याचे ताशेरे सुप्रीम कोर्टानं ओढले आहेत.

१९९३ नंतर कोळसा खाण वाटपात सर्व कायदे धाब्यावर बसवण्यात आले आहेत त्यामुळं हे सर्व परवाने सुप्रीम कोर्टानं रद्द केले आहेत. परवाना पाटपात पारदर्शकता बाळगली गेली नसल्याचंही कोर्टानं नमूद केलंय. 

ज्या खाणींच्या परवान्याचा कार्यकाळ आधीच संपला आहे अशांना कोणत्या प्रकारचा दंड देण्यात यावा यासाठी आता १ सप्टेंबरला सुनावणी होणार आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.