पाली/उदयपूर: राजस्थानमध्ये उदयपूरकडे जाणाऱ्या हायवेवर भूत पाहिल्याचा दावा केला गेलाय. आठवड्यापासून व्हॉट्स अॅप ग्रुपवर या 'भूताचे' फोटो शेअर केले जात आहेत.
आणखी वाचा - लाच मागितली म्हणून तहसील कार्यालयात सोडले साप
मिळालेल्या माहितीनुसार हे फोटो हायवेवर वॉल्वो बसच्या एका ड्रायव्हरनं काढलेत. ड्रायव्हर रात्री हायवेवर बस चालवत होता. उदयपूरजवळ भर रस्त्यातून त्याला एक महिला चालतांना दिसली. दुसऱ्याच क्षणी ती महिला समोरून जाणाऱ्या ट्रकच्या छतावर बसली. ते भूत असल्याचं ड्रायव्हरचं म्हणणं होतं.
दुसरीकडे व्हॉट्स अॅपवर हे फोटो वायरल झाले असून भूत पाहिल्याची खिल्ली उडवत आहेत. यूजर्सचं म्हणणं आहे की, 'फोटो हायवेवरील बस किंवा ट्रकच्या ड्रायव्हिंग केबिनमधून नक्की घेतली गेलीय, पण इमेज पूर्णपणे फोटोशॉप्ड आहे.'
आपण जर निट बघितलं तर कळतं हे फोटोशॉपनं केलंय. तेव्हा असे फोटो व्हॉट्स अॅपवर शेअर करू नका.
आणखी वाचा - व्हॉट्सअॅपवर कमेंट, तरूणाला चौकात केली फाशी देण्याची तयारी
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.