६८व्या वर्षी दिग्विजय सिंह चढले बोहल्यावर, अमृता रायशी विवाहबद्ध

काँग्रेसचे महासचिव दिग्विजय सिंह यांनी टिव्ही अँकर अमृता रायसोबत विवाहबद्ध झाल्याची बातमी आहे. इंडियन एक्सप्रेसमधील बातमीनुसार अमृता आणि दिग्विजय यांनी गेल्या महिन्यातच चेन्नईमध्ये विवाह केला. गेल्यावर्षी त्यांचे खाजगी फोटो सोशल मीडियावर वायरल झाले होते.

Updated: Sep 6, 2015, 12:01 PM IST
६८व्या वर्षी दिग्विजय सिंह चढले बोहल्यावर, अमृता रायशी विवाहबद्ध  title=

नवी दिल्ली: काँग्रेसचे महासचिव दिग्विजय सिंह यांनी टिव्ही अँकर अमृता रायसोबत विवाहबद्ध झाल्याची बातमी आहे. इंडियन एक्सप्रेसमधील बातमीनुसार अमृता आणि दिग्विजय यांनी गेल्या महिन्यातच चेन्नईमध्ये विवाह केला. गेल्यावर्षी त्यांचे खाजगी फोटो सोशल मीडियावर वायरल झाले होते.

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह सध्या अमेरिकेत असल्याची माहिती आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिग्विजय सिंहांच्या जवळच्यांनी या लग्नाच्या बातमीवर शिक्कामोर्तब केलंय.

आणखी वाचा - दिग्गीराजा होणार दुल्हेराजा, दिग्गींचे संबंध अखेर उघड

राज्यसभा टिव्हीमध्ये अँकर असलेल्या अमृता रायकडून अद्याप याबाबत काहीही वक्तव्य आलेलं नाही. सध्या अमृता राय सुट्टीवर असल्याचं कळतंय. 

दिग्विजय सिंह यांनी एप्रिल २०१४मध्ये अमृता सोबतचे त्यांचे खाजगी फोटो लीक झाल्यानंतर त्यांच्या नात्याबद्दल कबुली दिली होती. त्यांनी ट्विटरवर लिहिलं होतं, 'अमृता आणि तिच्या पतीनं सामंजस्यानं घटस्फोटासाठी अर्ज केलाय. जसा याबाबत निर्णय होईल आम्ही आमच्या नात्याला औपचारिक नाव देऊ.'

त्यानंतर अमृता राय यांनीही ट्विटरवर लिहिलं होतं, 'मी माझ्या पतीसोबत वेगळी झालीय आणि सामंजस्यानी आम्ही घटस्फोट घेणार आहोत.त्यानंतर मी दिग्विजय सिंहांसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतलाय.'

दीर्घ आजारानंतर दिग्विजय सिंहांच्या पत्नीचं २०१३मध्ये निधन झालं. दिग्विजय सिंह यांना चार मुली आणि एक मुलगा आहे. 

दरम्यान, अमृता रायनं आपल्या फेसबुकवरून याबातमीवर शिक्कामोर्तब केलंय...

I would like to share with my friends that I and Digvijaya Singh have married in a solemn ceremony, as per the Hindu rites. We have also later registered our marriage.

On this occasion, I would like to thank all those who have stood by me through all the difficult times that I faced recently. Last one and a half years have been particularly stressful and traumatic. I was the victim of a cyber crime, but was treated as a criminal. I was trolled and abused in most derogatory language for no fault of mine. Those who themselves have no concept or belief in love and dignity tried to shame me on social media. But all during this period, I kept a dignified silence and went on with my work, believing in myself and my love for DIgvijaya.

I know, question have been raised and will be raised on the age difference between us. But I sincerely feel that at my age I know what is good for me and I can take my decisions as per my own wisdom. We live in a modern, progressive India, and the constitutional and legal framework has empowered me to decide about my life and my life’s choices.

I also know that motives can be attributed to my decision. Time is the only final arbitrator in such matters. I am a professional woman, who has worked hard throughout my career and have made a place and reputation for myself. I believe in my professional capabilities and like any other modern women, I have and will continue to shoulder my personal and family responsibilities on my own.

I have married Digvijaya Singh for love. Therefore, I have already requested him to transfer all his property and belongings to his son and daughters. I only want to embark on this new journey with him, working towards a dignified, professional career.

Once again, thank you all my friends, my office colleagues and well-wishers for everything.

Amrita

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.