जुनागड : गुजरातमधल्या जुनागडमध्ये 8 सिंहांचा एक समूह कॅमे-यामध्ये कैद झाला आहे. या समूहामध्ये दोन छावेही आहेत. गिरनार पर्वतराजीमधल्या भावनाथ तालेती इथून हे सिंह आले असावेत असा अंदाज आहे.
गिरनारच्या अभयारण्यामध्ये अंदाजे 45 सिंह आहेत. जुनागडमध्ये रस्त्यावर मुक्तपणे फिरणाऱ्या जंगलाच्या राजाला बघून अनेकांच्या डोळ्याचं पारणं फिटलं. मात्र या भागात गावं, शाळा, रुग्णालयं असल्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीही पसरली आहे.
WATCH: A pride of lions seen sauntering through an inhabited road of Junagadh in Gujarat (11.7.16)https://t.co/fJauTPzYMj
— ANI (@ANI_news) July 13, 2016