नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी योजना 'स्मार्ट सिटी'मध्ये महाराष्ट्राच्या १० शहरांचा समावेश करण्यात आला आहे, देशभरात पहिल्या टप्प्यात २० आणि दुसऱ्या टप्पात ८० शहरं स्मार्ट केल्या जाणार आहेत. केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी १०० पैकी ९८ शहरांची यादी आज जाहीर केली. उरलेली दोन शहरं जम्मू - काश्मीरमध्ये असतील, असं केंद्रीय शहर विकार मंत्री व्यंकय्या नायडू यांनी म्हटलंय.
महाराष्ट्रात स्मार्ट सिटी योजनेत खालील दहा शहरांचा समावेश करण्यात आला आहे.
१) मुंबई, २) नवी मुंबई, ३) ठाणे, ४) कल्याण- डोंबिवली, ५) नाशिक, ६) पुणे, ७) औरंगाबाद, ८) अमरावती, ९) नागपूर आणि १०) सोलापूर यांचा समावेश आहे.
व्यंकय्या नायडू यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील १०० स्मार्ट सिटीवर पुढील पाच वर्षात तब्बल ४८ हजार कोटी खर्च करण्यात येणार आहेत. 'स्मार्ट सिटी' योजनेत राज्य आणि केंद्र सरकारचा वाटा ५०-५० टक्क्यांचा आहे.
सरकारने आज जाहीर केलेल्या ९८ शहरांच्या यादीत २४ राजधान्यांचा समावेश आहे, चार स्मार्ट सिटींच्या शहरांची लोकसंख्या ५० लाखांहून अधिक असेल.
कोणत्या राज्याच्या किती शहरं 'स्मार्ट' होणार?
१) उत्तर प्रदेश : १३ (सर्वाधिक)
२) तामिळनाडू १२,
३) महाराष्ट्र १०,
४) मध्य प्रदेश ७
५) गुजरात ६
६) कर्नाटक ६
७) राजस्थान ४
८) पश्चिम बंगाल ४
९) आंध्र प्रदेश ३
१०) पंजाब ३
११) बिहार ३
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.