जनगणना २०११ : सात राज्यात अल्पसंख्यक आहे हिंदू

नुकतेच २०११ च्या जनगणनेचे एक धक्कादायक सत्य समोर आले आहे. देशात बहुसंख्यक समजले जाणारे हिंदू भारतातील सात राज्यात अल्पसंख्यक आहे. यातील काही प्रदेशात हिंदूची संख्या १० टक्क्यांपेक्षा कमी आहे. 

Updated: Aug 27, 2015, 02:35 PM IST
जनगणना २०११ : सात राज्यात अल्पसंख्यक आहे हिंदू  title=

मुंबई : नुकतेच २०११ च्या जनगणनेचे एक धक्कादायक सत्य समोर आले आहे. देशात बहुसंख्यक समजले जाणारे हिंदू भारतातील सात राज्यात अल्पसंख्यक आहे. यातील काही प्रदेशात हिंदूची संख्या १० टक्क्यांपेक्षा कमी आहे. 

एका प्रमुख हिंदी वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार २०११ च्या जनगणनेतील जे आकडे समोर आले. त्यात मिझोरम, मेघालय, जम्मू-काश्मिर, अरूणाचल, पंजाब, मणिपूर आणि लक्षद्विप यात सात राज्यांमध्ये हिंदू अल्पसंख्यक आहेत. या प्रदेशात ख्रिश्चन आणि मुस्लिम बहुसंख्याक आहे. 

अधिक वाचा :  देशात हिंदूंची टक्केवारी घटली, मुस्लिमांची वाढली

यातील शीख बहुल पंजाबमध्ये हिंदू अल्पसंख्यक आहेत. यात हिंदूंची संख्या ३८.४९ टक्के आहे. मिझोरममध्ये हिंदू केवळ २.७५ टक्के आहेत. २००१मध्ये ही आकडेवारी ३.५५ टक्के होती. गेल्या दहा वर्षात हिंदूंची संख्या घटली आहे. 

लक्षद्विपमध्ये २००१ मध्ये हिंदू ३.६६ टक्के होते. आता २०११ मद्ये त्यांची संख्या कमी होऊन २.७७ टक्के झाली आहे. जम्मू काश्मीरमझ्ये हिंदू लोकसंख्या २९.६३ टक्क्यांवरून घटून २८.४४ टक्के राहिली आहे. 

या शिवाय केरळमध्ये मात्र ४.९ टक्के आणि लक्षद्विमध्ये ६.३ टक्क्यांनी हिंदूची लोकसंख्या वाढली आहे. नागालँड आणि मेघालयातही हिंदू अल्पसंख्यक आहेत. 

नागालँडमध्ये ८.७५ आणि मेघालयात ११.५३ टक्के हिंदू आहेत. मणीपूरमध्येही हिंदूंची संख्या ४१.३९ टक्के आहे. मणीपूरमध्ये २००१मध्ये ही टक्केवारी ४६.०१ टक्के होती. 

अरूणाचल प्रदेशात हिंदूंची लोकसंख्या ३४.६० टक्क्यांनी घटून २९.०४ टक्के झाली आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.