लंडन : सध्याच्या डिजीटल जमान्यात पॉर्न फिल्म पाहणे सर्वसामान्य झाले आहे. पॉर्न फिल्म पाहणाऱ्यांमध्ये पुरुषांची संख्या अधिक आहे. मात्र आता महिलांचेही प्रमाण वाढू लागले आहे.
नुकत्याच करण्यात आलेल्या संशोधनानुसार, दर तीनपैकी एक महिला आठवड्यातून कमीत कमी एक वेळा पॉर्न फिल्म पाहते.'द इंडिपेंडंट'च्या रिपोर्टनुसार, ३००० हजार महिलांपैकी ९० टक्के ऑनलाईन आणि दोनतृतीयांश महिला आपल्या स्मार्टफोनवर पॉर्न आणि अॅडल्ट फिल्म पाहतात.
सर्वेक्षणात ३१ टक्के महिला प्रत्येक आठवड्याला पॉर्न फिल्म पाहतात. तर इतर ३० टक्के महिलांनी महिन्यातून एखाद-दोन वेळा पॉर्न फिल्म पाहत असल्याचे सांगितले.
तसेच अधिकाधिक महिला एकट्या असताना पॉर्न फिल्म पाहणे पसंत करत असल्याचेही सर्वेक्षणातून समोर आले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.