पांढरे केस काळे करण्यासाठी घरगुती उपाय

आज अगदी कमी वयातच केस पांढरे होण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात केसांची काळजी घेणे अशक्य झाले आहे. कामाचा जास्त ताण असल्याने आणि प्रदुषणामुळे केस पांढरे होण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे.

Updated: Dec 20, 2015, 05:15 PM IST
पांढरे केस काळे करण्यासाठी घरगुती उपाय title=

मुंबई : आज अगदी कमी वयातच केस पांढरे होण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात केसांची काळजी घेणे अशक्य झाले आहे. कामाचा जास्त ताण असल्याने आणि प्रदुषणामुळे केस पांढरे होण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे.

आज अनेक जण डाय, मेंहदी किंवा बाजारात मिळणाऱ्या अनेक वस्तूंपासून आपले केस काळे करतात. पण तुम्ही घरगुती केस काळे करू शकता. 

केस काळे करण्यासाठी घरगुती उपाय : 

१. दूध आणि दही यांचं एकत्रित मिश्रण करून केसांवर लावल्याने केस काळे होण्यास मदत होते.

२. कच्च्या पपईची पेस्ट करुन डोक्याला १० मिनिटं लावून ठेवल्याने केस गळत नाही आणि कोंडाही होत नाही.

३. तीळ खाल्ल्याने आणि तीळचं तेल डोक्याला लावल्याने केस मजबूत होतात.

४. रोज केसांवर कांद्याची पेस्ट लावल्याने पांढरे केस काळे होण्यास मदत होते.

५. आवळ्याच्या पावडरमध्ये लिंबाचा रस टाकून ते केसांवर लावल्याने पांढरे केस काळे होतात. 

६. दररोज साजूक तुपाने डोक्याची मालिश केल्याने केस काळ राहतात.

७. दहीमध्ये चिमुटभर काळी मिरी आणि लिंबाचा रस एकत्र करून केसांवर लावल्याने फायदा होतो.