महिन्याभरात वाढवा वजन

वजन वाढवण्यासाठी लोक हरत-हेचे प्रयत्न करतात. मात्र अयोग्य जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी यामुळे वजन काही वाढत नाही. आपल्या दिनचर्येत कॅलरी, पोषक तत्वे, फॅट आणि प्रोटीनची मात्र असलेल्या पदार्थांचा वापर वाढवला तर नक्कीच वजन वाढू शकते. यासाठी १० सोप्या टिप्स

Updated: Dec 20, 2015, 02:53 PM IST
महिन्याभरात वाढवा वजन title=

नवी दिल्ली : वजन वाढवण्यासाठी लोक हरत-हेचे प्रयत्न करतात. मात्र अयोग्य जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी यामुळे वजन काही वाढत नाही. आपल्या दिनचर्येत कॅलरी, पोषक तत्वे, फॅट आणि प्रोटीनची मात्र असलेल्या पदार्थांचा वापर वाढवला तर नक्कीच वजन वाढू शकते. यासाठी १० सोप्या टिप्स

१. भरपूर कॅलरी देणारे पदार्थ खा. ड्रायफ्रुटस, बदाम, मनुका यात मोठ्या प्रमाणावर कॅलरीज असतात. यामुळे तुमचे वजन वाढण्यास मदत होईल. 

२. पोषकत्वांनी भरपूर असा आहार घ्या. वजन वाढवण्याआधी हे लक्षात घ्या तुम्हाला स्वस्थ शरीर हवयं लठ्ठपणा नकोय. त्यामुळे शरीराला उर्जा मिळेल असे अन्न घ्या.

३. वजन वाढवण्यासाठी नियमित व्यायाम गरजेचा. तुम्ही योगाही करु शकता. वेट ट्रेनिंग, ट्विस्ट कर्ल्स आणि डिप्ससारख्या व्यायामुळे शरीरात रक्तसंचार वाढतो आणि अधिक भूक लागते.

४. प्रोटीनची मात्रा वाढवा. प्रोटीनयुक्त मासे,अंडी, मोड आलेले चणे, चिकन, भात, दूध आणि दुधाचे पदार्थ, मेवा, बीन्स यां पदार्थांचे आठवड्यातून दोन वेळा सेवन करा.

५. वजन वाढवण्यासाठी तुमच्या आहारात पनीर, लोणी तसेच तूपाचा समावेश करा. 

६. तुम्हाला वजन वाढवायचे असल्यास अधिक प्रमाणात जेवण करावे लागेल. सुरुवातीला एकदम जेवण वाढवणे जमणार नाही. मात्र हळूहळू सुरुवात करा. 

७. वजन वाढवण्यासाठी हिरव्या भाज्या खाणे लाभदायक ठरते. त्यामुळे तुमचे आरोग्यही सुधारते आणि विनातणाव तुम्ही वजन वाढवू शकता. 

८. वजन वाढवण्यासाठी तुमच्या आहारातून ५०० कॅलरी शरीरात जाणे आवश्यक आहे. तुम्ही शारिरीक काम करत असाल तर कॅलरीजची मात्रा वाढवा. 

९. दिवसातून तीन वेळा मोठा आहार घ्या. तसेच २-३ वेळा अल्पोपहार घ्या. प्रत्येक २-३ तासाला काहीतरी खात राहा. 

१०. वजन वाढवण्यासाठी योग्य झोप मिळणे आवश्यक असते. दिवसांतून किमान आठ तासांची पुरेपूर झोप घ्या.