नवी दिल्ली: किवी फळ दिसायला चिकू सारखं दिसतं. हे 'हिटॅमिन सी'नं परिपूर्ण असतं. डॉक्टरांच्या मते दररोज एक किवी फळ खाल्ल्यानं व्यक्तीचं आयुष्य वाढतं. हे फळ मनुष्याची आनंदी मनस्थिती कायम राखण्याचा नैसर्गिक स्रोत आहे.
याचं नियमितपणे सेवन केल्यानं मनुष्याचं आयुष्य वाढतं. किवी फळात सर्व उपयुक्त तत्व आहेत. ज्याची शरीराला गरज असते. फळात व्हिटॅमिन सीचं प्रमाण अधिक असल्यानं अनेक रोगांपासून आपला बचाव करण्यास मदत मिळते. सोबतच डिप्रेशनची समस्याही दूर ठेवतो.
किवी फळ खाल्ल्यानं हृदय रोगांपासून दूर राहता येतं. किवी खाल्ल्यानं ब्लड शुगर कमी होते. फळ खाल्ल्यानं दिवसभरातील थकवा पळून जातो. फळाचा आतला भाग जितका गुणकारी आहे तितकेच त्याचे सालं सुद्धा खूप गुणकारी आहेत. हे फळ डायबिटीजच्या रुग्णांसाठी खूप उपयुक्त असते.
हे फळ खाल्ल्यानं व्यक्तीचा व्यवहार आनंदी असतो आणि दिवसभर शरीरात स्फूर्ती कायम राहते. किवी फळ कॅन्सर सारख्या आजारांमध्येही दिलासा देतो. शरीरातील रक्ताची कमतरताही पूर्ण करते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.