जाणून घ्या... तुमच्यासाठी किती झोप आवश्यक आहे!

खूप जास्त किंवा खूप कमी झोपेचा तुमच्या स्वास्थ्यावर परिणाम होतो, हे सगळ्यांनाच ठाऊक असेल. अमेरिकन नॅशनल स्लीप फाऊंडेशननं कुणाला किती झोप आवश्यक आहे, यावर विश्लेषण सादर केलंय. 

Updated: Feb 13, 2015, 03:57 PM IST
जाणून घ्या... तुमच्यासाठी किती झोप आवश्यक आहे! title=

न्यूयॉर्क : खूप जास्त किंवा खूप कमी झोपेचा तुमच्या स्वास्थ्यावर परिणाम होतो, हे सगळ्यांनाच ठाऊक असेल. अमेरिकन नॅशनल स्लीप फाऊंडेशननं कुणाला किती झोप आवश्यक आहे, यावर विश्लेषण सादर केलंय. 

शोधकर्त्यांनी केलेल्या विश्लेषणानुसार, तीन महिन्यांपर्यंतच्या नवजात बालकांना दरदिवशी १४ ते १७ तासांची झोप आवश्यक आहे. तर चार महिने ते ११ महिन्यांच्या बालकाला कमीत कमी १२-१५ तासांची झोप आवश्यक आहे. 

तसंच, १४ ते १७ वर्षांच्या किशोर अवस्थेतील मुलांना कमीत कमी आठ ते १० तासांची तर वयस्कर लोकांनी दररोज सात तासांपेक्षा कमी तसंच नऊ तासांपेक्षा जास्त झोपू नये, असा निष्कर्ष शोधकर्त्यांनी लावलाय. 

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, आई - वडिलांनी आपल्या शाळेत जाणाऱ्या मुलांनी (सहा ते १३ वर्ष) कमीत कमी नऊ तासांची झोप काढावी याची काळजी घ्यावी. त्यांच्यासाठी ११ तासांची झोप सर्वोत्तम राहील.

एक ते दोन वर्षांच्या मुलांसाठी ११ ते १४ तासांची, तर तीन ते पाच वर्षांच्या मुलांसाठी ११ ते १३ तासांची झोप घेण्याचा सल्ला दिला गेलाय. 

हे संशोधन 'स्लीप हेल्थ' या पत्रिकेत प्रकाशित करण्यात आलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.