मुंबई : रोजच्या जेवणामध्ये मसाल्यांमध्ये हळदीचे स्थान महत्त्वाचे आहे. हळद केवळ जेवणाचा स्वाद वाढवण्यासाठीच वापरली जात नाही तर त्यात अनेक औषध गुणधर्मही असतात. त्यामुळे आयुर्वेदातही हळदीचे स्थान मोठे आहे.
हळदीच्या वापराने अवघ्या काही मिनिटांत दात तुम्ही दात चमकवू शकता. हळद आणि नारळाचे तेल मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट दातांवर लावा. मिनिटभरात दात चमकायला लागतील.
केसात कोंडा ही साधारण समस्या आहे. यावरही हळद गुणकारी आहे. हळद आणि खोबऱ्याचे तेल एकत्रित मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट केसांच्या मुळाशी लावून २० मिनिटे ठेवा. त्यानंतर केस धुवा. यामुळे कोंड्याची समस्या दूर होते.