www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
तुम्हाला जर कॉफीची तल्लप असेल आणि एका दिवसात जास्तीत जास्त कप कॉफी तुमच्या पोटात जात असेल तर सांभाळून राहा... एका नव्या अभ्यासानुसार, कॉफीचं जास्त सेवन करणाऱ्या ५५ वर्षांपेक्षा कमी वयोगटाच्या व्यक्तींना मृत्यूचा धोका जास्त आहे.
अमेरिकेत झालेल्या एका सर्व्हेक्षणानुसार, एका आठवड्यात २८ पेक्षा जास्त आणि एका दिवसात चारपेक्षा जास्त कप कॉफी पिणाऱ्या व्यक्तींच्या मृत्यूचं प्रमाण वाढलेलं आढळलं. हा धोका पुरुषांना ५० टक्के तर स्त्रियांमध्ये ५५ वर्षांपेक्षा कमी वयोगटातील महिलांमध्ये जास्त प्रमाणात असतो, परंतु ५५ वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील व्यक्तींवर मात्र जास्त प्रमाणात कॉफी पिल्याचा काहीही परिणाम दिसून येत नाही, असंही या वयोगटानुसार आधारित सर्व्हेक्षणात आढळलंय.
दक्षिण कॅरोलीना विश्वविद्यालयाच्या शोधकर्त्यांनी अमेरिकेत १९७१ ते २००२ पर्यंत २० ते ८७ वर्षांपर्यंतच्या ४३ हजार व्यक्तींवर कॉफीच्या सेवनाच्या परिणामांचा अभ्यास केला. १७ वर्षांच्या या काळात २,५०० पेक्षा अधिक सहभागींचं निधन झालं. अभ्यासाअंती लक्षात आलं की, तरुण पुरुषांचा मृत्यूदर हा अधिक होता. सगळ्याच कारणांमध्ये मृत्यूदरात ५६ टक्क्यांनी वाढ झाली होती. एका आठवड्यात २८ कपपेक्षा जास्त कॉफी घेणाऱ्या तरुण महिलांमध्ये मात्र मृत्यूचा धोका इतर महिलांच्या प्रमाणात दुप्पट वाढलेला आढळला.
एका दिवसातात १-२ कप किंवा जास्तीत जास्त तीन कप कॉफी घेणं सुरक्षित असल्याचा अंतिम निष्कर्ष दक्षिण कॅरोलीना विश्वविद्यालयाच्या या अभ्यासात काढण्यात आला.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.