बॉडी बनवण्यासाठी व्यायामाचे सोपे प्रकार

तरुण मुले मसल्स बनवण्यासाठी काय काय नाही करत. जिम जॉईन करतात, डाएट प्लान फॉलो करतात. मात्र तुम्हाला माहीत आहे का व्यायामाच्या सोप्या प्रकारांनी तुम्ही बॉडी बनवू शकता.

Updated: Jan 18, 2017, 03:22 PM IST
बॉडी बनवण्यासाठी व्यायामाचे सोपे प्रकार title=

मुंबई : तरुण मुले मसल्स बनवण्यासाठी काय काय नाही करत. जिम जॉईन करतात, डाएट प्लान फॉलो करतात. मात्र तुम्हाला माहीत आहे का व्यायामाच्या सोप्या प्रकारांनी तुम्ही बॉडी बनवू शकता.

१. दररोज चालण्याची सवय लावा. सुरुवातीला हळू हळू चाला. मात्र त्यानंतर चालण्याचा वेग वाढवण्यास सुरुवात करा. 

२. गुडघ्यात पाय वाकवून खुर्चीवर बसल्यासारखी स्थिती म्हणजे स्कॉट. इंडियन स्टाईल कमोडवर बसायचे असेल तर तुम्ही नकळत लाँग स्कॉट करता. जर हा प्रकार खूप रिपिटेशन्स मध्ये केला तर अनेक फायदे होतात. यामुळे पायांचे मसल्स मजबूत होतात. 

३. पुश-अप्स केल्याने मसल्स बनवण्यात मोठी मदत होते. पुश-अप्स करताना तुमचे संपूर्ण शरीर सरळ असले पाहिजे.  

४. साइड लंज केल्याने मांसपेशी मजबूत होतात. दररोज १० मिनिटे हा व्यायाम प्रकार केल्याने मांसपेशी मजबूत होण्यास मदत होते.