नवी दिल्ली : प्रदूषणामुळे मुलं वेळेअगोदरच जन्म घेत असल्याचं नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात समोर आलंय.
वायू प्रदूषणामुळे सध्या प्री - मॅच्युअर डिलिव्हरींच्या संख्येत वाढ होतेय. अभ्यासकांच्या मते, वायू प्रदूषणामुळे गर्भवती महिलांच्या प्लेसेंटामध्ये जळजळ वाढते... त्यामुळे, मुलांचा जन्म वेळेअगोदरच होण्याची शक्यता वाढते. याचाच परिणाम म्हणून अनेक मुलांच्या स्वास्थ्यासंबंधीच्या समस्या वाढतात... मुल अपंगही जन्माला येऊ शकतं.
प्री-मॅच्युअर मुलांच्या जन्मानंतर त्यांची काळजी घेणं गरजेचं असतं. मुलाला योग्य प्रमाणात आईच्या दुधाची गरज असते. नवजात बालकांना गाय किंवा म्हशीचं दूध पाजणं योग्य नाही... हे त्यांच्यासाठी धोकादायक ठरू शकतं.
जन्मानंतर प्री मॅच्युअर मुलांसाठी 'कांगारु केअर'ही महत्त्वाची ठरते. कांगारु केअर म्हणजे जास्तीत जास्त वेळ मुलं आईच्या कुशीत राहिल्यानं अशा बालकांचा मृत्यूदर घटल्याचंही या अभ्यासात समोर आलंय.