'माझा प्रॉब्लेम असेल तर बायकोला तिकीट द्यायचं होतं'

मला भाजप सोडून इतर पक्षांनी संपर्क केलाय. मात्र मी अजून कुठलाही निर्णय घेतलेला नाही, असं सुरेश कलमाडींनी स्पष्ट केलं.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Mar 22, 2014, 12:01 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, पुणे
पुण्याचा एकेकाळचा सबसे बडा खिलाडी, काय भूमिका घेणार, याकडे पुणेकरांचं लक्ष लागलं होतं. मला भाजप सोडून इतर पक्षांनी संपर्क केलाय. मात्र मी अजून कुठलाही निर्णय घेतलेला नाही, असं सुरेश कलमाडींनी स्पष्ट केलं. त्याचबरोबर पत्नीला उमेदवारी न मिळाल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली. 
`मी गेल्या अनेक वर्षांपासून काम करतोय... यश नक्की मिळणार...` असा विश्वासदेखील त्यांनी यावेळी व्यक्त केलाय. कॉमनवेल्थ घोटाळ्यात अडकलेले कलमाडी यानंतर म्हणतात `माझा काही प्रॉब्लेम असेल तर माझ्या बायकोला तिकीट द्या, अशी मागणी मी केली होती... माझी बायको दोषी नाही... मग, तिला का तिकीट दिलं गेलं नाही? तीदेखील काँग्रेस पक्षाचंच काम करतेय... सर्व झोपडपट्टीमध्ये ती जात असते आणि दर महिन्याला रिपोर्ट देत असते... मला` असं म्हणत आपल्या कुटुंबीयांना तिकीट न मिळण्याची खंत त्यांनी जाहीरपणे व्यक्त केलीय.
काल कलमाडी हाऊसमध्ये कलमाडी समर्थकांची बैठक झाली. सध्या मी फक्त पन्नास टक्के कार्यकर्त्यांशीच चर्चा केलीय, आणखी कार्यकर्त्यांनी चर्चा करुन मग निर्णय घेणार असल्याचं कलमाडींनी म्हंटलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.