www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
भारताचे 15वे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी आज शपथ घेतली. शपथविधी सोहळ्याला एनडीएचा सर्वांत जुना घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सहकुटुंब उपस्थित होते. मात्र त्याच वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना समारंभाचं निमंत्रणच नव्हतं.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नरेंद्र मोदी यांना जाहीर पाठिंबा देण्याची घोषणा करणाऱ्या मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना मात्र शपथविधीचं निमंत्रण पाठविण्यात आलं नसल्यानं ते कार्यक्रमाला उपस्थित नव्हते.
मनसेतील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मोदी किंवा एनडीएकडून अधिकृत निमंत्रण आलं नसल्यानं राज ठाकरे उपस्थित राहण्याचा प्रश्निच उद्भवत नसल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. देशातील सर्व लहान-मोठ्या पक्षांना शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण पाठविण्यात आलं असताना मनसेला यातून वगळण्यात आल्याबाबत आश्चणर्य व्यक्तत करण्यात येतंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.