www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी ७ रेसकोर्स रोड येथील पंतप्रधान निवासस्थानी शिफ्ट झाल आहे. ७ आरसीआर पंतप्रधानाचे अधिकारीक निवासस्थान असते.
पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यावर मोदी गुजरात भवनमध्ये राहत होते. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी निवासस्थान रिकामे केल्यानंतर रंगरंगोटीचे काम सुरू होते. त्यामुळे मोदी गुजरात भवनमध्ये राहत होते.
शपथविधी सोहळ्यानंतर सांगण्यात येत होते की, मोदी ३० मे पर्यंत सरकारी निवासस्थानात शिप्ट होतील. २० मेनंतर एनडीएचा नेते म्हणून मोदींची निवड झाल्यानंतर गुजरात भवन हे मोदींचे निवासस्थान झाले होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान मोदी आपले निवास स्थान ७ रेसकोर्स रोडवर घर ठेवणार नाही तर ५ रेसकोर्सवरील घर ठेवणार आहे.
मनमोहन सिंग ५ रेसकोर्स रोड येथील बंगल्याचा वापर आपल्या कार्यालयासाठी करीत होते. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आपला ७ रेसकोर्स येथील सरकारी बंगला सोडल्यानंतर सरकारने दिलेल्या नव्या घरात पोहचले आहेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.