देशात मोदींची हवा नाही - नगमा

देशात भाजपचे नेते नरेंद्र मोदी यांची हवा नाही. मोदींची हवा असती तर ते सुरक्षित जागेवर निवडणूक लढविली नसती. ज्या ठिकाणी 35 ते 40 जागा भाजपने गमावल्या आहेत, त्या ठिकाणाहून निवडणूक लढविली असती तर तसे म्हणता आले असते, असा चिमटा चित्रपट अभिनेत्री आणि मेरठ लोकसभा मतदार संघातील काँग्रेसची उमेदवार नगमा हिने मोदींना काढला.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 16, 2014, 01:14 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, इंदोर
देशात भाजपचे नेते नरेंद्र मोदी यांची हवा नाही. मोदींची हवा असती तर ते सुरक्षित जागेवर निवडणूक लढविली नसती. ज्या ठिकाणी 35 ते 40 जागा भाजपने गमावल्या आहेत, त्या ठिकाणाहून निवडणूक लढविली असती तर तसे म्हणता आले असते, असा चिमटा चित्रपट अभिनेत्री आणि मेरठ लोकसभा मतदार संघातील काँग्रेसची उमेदवार नगमा हिने मोदींना काढला.
इंदोरमधील काँग्रेस उमेदवार सत्यनारायण पटेल यांच्या प्रचारासाठी नगमा आली असता मोदींवर जोरदार हल्लाबोल केला. नगमाने जाहीर सभेत सांगितले, मोदींची देशात हवाच नाही. भाजपची खोटी गुजरात विकास एक्स्प्रेस सुरु आहे. तसीच दुसरी खोटी एक्स्प्रेस मध्यप्रदेशमधून सुरू आहे.
मध्यप्रदेशमध्ये घोटाळे आणि महिलांवर होणाऱ्या गुन्हांमध्ये वाढ होत आहे. यामध्ये हे राज्य एक नंबरवर गेले आहे. यावेळी मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनावरही टीका केली. मी केवळ तीन मामांना ओळती. एक शकुनी मामा, कंस मामा आणि शिवराज मामा. शिवराज मामा आपल्या भाच्याची सुरक्षा करु शकलेले नाहीत. मध्यप्रेदशमध्ये चार वर्षांच्या मुलीवर बलात्कार होत आहेत. गुन्हे आणि बलात्कार अशा घटनेत मध्यप्रदेश आघाडीवर आहे. तसेच घोटाळेही होत आहेत. खान घोटाळा, निवृत्ती वेतन घोटाळा, सुगनीदेवी कॉलेज जमीन घोटाळा, व्यापमं घोटाळा असे अनेक घोटाळे झाले आहेत. व्यापमं घोटाळ्यामुळे 78 लाख कुटुंब बेघर झालेत, अशी टीका नगमा हिने केली.
काँग्रेसने लोकांसाठी मनरेगा, माहिती अधिकार, अन्न सुरक्षा अधिकार, 18 वयोगटातील युवकांना मतदानांचा हक्क, भूमी संपादन आणि पुनर्वसन कायदा, भ्रष्टाचारविरोधात जनलोकपाल आदी महत्वाचे निर्णय घेतले. काँग्रेस हा पक्ष विकास करू शकतो आणि स्थिर सरकार देऊ शकतो, असा दावा नगमा हिने केला.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.