www.24taas.com, वृत्तसंस्था, नवी दिल्ली
`हर हर मोदी` नाऱ्यावर शंकराचार्य स्वरुपानंद यांनी नाराजी व्यक्त केलीय. भाजप कार्यकर्त्यांकडून होणाऱ्या या नारेबाजीवर त्यांनी जोरदार आक्षेप घेतलाय. याबाबत त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशीही चर्चा केली.
स्वरुपानंद यांच्या नाराजीची भाजप आणि मोदींनी दखल घेतलीय. उत्साही कार्यकर्ते हे नारे देत असून ते थांबवावे असं आवाहन मोदींनी ट्विटरच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना केलंय.
तर दुसरीकडे काँग्रेसचे महासचिव दिग्विजय सिंह यांनी भाजपवर `हर-हर मोदी` या नाऱ्यावरून हल्लाबोल केलाय. दिग्विजय सिंह यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं की, "हिंदूंचा सन्मान वाचला, शंकराचार्यांच्या बोलण्यानंतर मोदींनी हा नारा वापस घेतलाय. महाराजांनी हिंदूंचा सन्मान वाचवला".
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.