www.24taas.com, झी मीडिया, कोलंबो
पाकिस्तान पाठोपाठ आता श्रीलंकेनंही भारतीय मच्छिमारांना सोडण्याचे आदेश दिले आहेत. श्रीलंकेचे अध्यक्ष महिंदा राजपक्ष हे भारताचे नियोजित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी समारंभाला येणार आहेत. या कार्यक्रमाला येण्याआधीच राजपक्ष यांनी हे आदेश दिले आहेत.
श्रीलंकेच्या ताब्यातील हे भारतीय मच्छिमार दूर समुद्रात गेल्यावर वाट चुकून श्रीलंकेच्या सागरी हद्दीत गेले असता, त्यांना कैद करून ठेवलं होतं.
नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीसाठी भारतानं सार्क देशांना आमंत्रित केल्यानंतर काही सकारात्मक बदलांना वेग आहे. सार्क देशांपैकी श्रीलंका आणि पाकिस्तान या शेजारी देशांच्या प्रमुखांना आमंत्रित करण्यावरून देशात खूप उलट सुलट प्रतिक्रिया आहेत. मात्र पाकिस्ताननं त्यांच्या ताब्यातील भारतीय मच्छिमारांची सुटका सद्भावना म्हणून केल्यानंतर आता श्रीलंकेनंही पाकिस्तानच्या पावलांवर पाऊल ठेवत त्यांच्या ताब्यातील भारतीय मच्छिमारांची सुटका करण्याचा निर्णय घेतलाय. त्याबाबत महिंद्रा राजपक्ष यांनी ट्विटही केलंय.
As a goodwill measure on the occasion of @narendramodi's swearing-in, President instructs officials to release Indian fishermen in custody.
— Mahinda Rajapaksa (@PresRajapaksa) May 25, 2014
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.