देशातील पाचव्या टप्प्यात ६९.०८ टक्के मतदान

आज देशभरात १२ राज्यातल्या १२१ मतदारसंघांमध्ये अनेक ठिकाणी मतदान होतंय. सर्वात जास्त जागा असलेल्या देशातल्या पाचव्या टप्प्यात आणि राज्यातल्य़ा दुसऱ्या टप्प्यात मतदानाला सुरुवात झालीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Apr 18, 2014, 07:27 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
आज देशभरात १२ राज्यातल्या १२१ मतदारसंघांमध्ये अनेक ठिकाणी मतदान झाले. सर्वात जास्त जागा असलेल्या देशातल्या पाचव्या टप्प्यात आणि राज्यातल्य़ा दुसऱ्या टप्प्यात मतदान पूर्ण झाले. देशातील १२ राज्यात सरासरी ६९.०८ टक्के मतदान झाले आहे. गेल्या निवडणुकीत याच भागात सुमारे ४५ टक्केच मतदान झाले होते. त्यामुळे सुमारे २४ टक्के वाढ झाली आहे. या मतदानाचा फायदा कोणाला होतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
सायंकाळी 6 वाजेपर्यंत देशातील मतदान
> झारखंड - 62 % मतदान
> उत्तर प्रदेश - 62.52% मतदान
> पश्चिम बंगाल - 78.89 % मतदान
> महाराष्ट्र - 61.80 % मतदान
> बिहार - 54% मतदान
> छत्तीसगड - 63.24 % मतदान
> मध्यप्रदेश - 54.41 % मतदान
> कर्नाटक - 68 % मतदान
> ओडिशा - 70 % मतदान
> राजस्थान - 63.25% मतदान
> मणीपूर - 80% मतदान
>जम्मू आणि काश्मिर - 69.08% मतदान
दुपारी 3 वाजेपर्यंत देशातील मतदान
> झारखंड - 55 % मतदान
> पश्चिम बंगाल - 70 % मतदान
> ओडिशा - 51 % मतदान
> महाराष्ट्र - 42 % मतदान
> राजस्थान - 40% मतदान
> बिहार - 30 % मतदान (2 वाजेपर्यंत)
> छत्तीसगड - 40 % मतदान (2 वाजेपर्यंत)
> मध्यप्रदेश - 40 % मतदान
> मणीपूर - 62 % मतदान (2 वाजेपर्यंत)
> कर्नाटक - 26 % मतदान (2 वाजेपर्यंत)
दुपारी 1 वाजेपर्यंत देशातील मतदान
> दार्जिलिंग- ५७.२२ टक्के मतदान
> जलपायगुडी - ६०.४३ टक्के मतदान
> कूचबिहार - ५९ टक्के मतदान
> अलिपुरदुआर - ६१.२७ टक्के मतदान
> प.बंगाल - ६२ टक्के मतदान
> झारखंड - 14 टक्के मतदान
> मध्य प्रदेशच्या 10 जागांवर - 11.46 टक्के मतदान
> महाराष्ट्र - 17.84 टक्के मतदान
> राजस्थान - 30 टक्क्यांहून अधिक मतदान
> उत्तर प्रदेश - 30 टक्क्यांहून अधिक मतदान
सकाळी 11 वाजेपर्यंत देशातील मतदान
> उत्तर प्रदेश: राज्यात मतदानाची टक्केवारी जोरात, 11 वाजेपर्यंत 27% मतदान
> राजस्थानमधील जोधपूरमध्ये २५ टक्के
> छत्तीसगडच्या तीन मतदारसंघात ३० टक्के मतदान
> ओडिशामध्ये २१ टक्के मतदान
> पश्चिम बंगालमध्ये 29 टक्के मतदान
> झारखंडमध्ये 12.74 टक्के मतदान
> बिहारमध्ये 22 टक्के मतदान
सकाळी १०.०० वाजेपर्यंत
* कर्नाटकातल्या शिमोगा मतदारसंघात माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ भाजप नेते बी.एस. येडियुरप्पा यांनी मतदान केलं. कर्नाटकात शिमोगाची लढत लक्षवेधी असून या लढतीकडे सर्वांचंच लक्ष लागलंय.
* कर्नाटकामध्ये वीरप्प्पा मोईली यांनी मतदानाचा हक्क बजावला.
* बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव आणि राबडीदेवी तसंच त्यांच्या कन्या मिसा भारती यांनीही आज मतदान केलं. पाटलीपूत्र मतदारसंघातून मिसा भारती या निवडणूक लढवतायत. त्यांचा सामना भाजपच्या रामकृपाल यादव यांच्याशी होतोय. राष्ट्रीय जनता दल आणि विशेषत: लालू प्रसाद यादव यांच्या परिवारासाठी पाटलीपूत्रची निवडणूक विशेष महत्त्वाची आहे.

सकाळी ९ वाजेपर्यंत देशात १०% मतदान
* उत्तर प्रदेश: सकाळी 9 वाजेपर्यंत राज्यात 11.17% मतदान
* रामपूर - 13%, मुरादाबाद - 12%, पिलिभित -10%
* राजस्थान - राज्यात 13.5% मतदान सकाळी 9 वाजेपर्यंत
* जसवंत सिंहाच्या बारमेरमध्ये- 13.39% मतदान
महाराष्ट्र - सकाळी ९.०० वाजेपर्यंत मतदान - १२ टक्के
* रत्नागिरी-सिंधुदुर्ग - १०.५० टक्के
* उस्मानाबाद - १० टक्के
* सोलापूर - १० टक्के
* नांदेड - ८.५ टक्के
* मावळ - ६.५ टक्के
* शिरुर - १९ टक्के
* सोलापूर - ८.७ टक्के
* कोल्हापूर - १० टक्के
* हातकणंगले - १०टक्के
* सांगली - १० टक्के
* सातारा - ७.३३ टक्के
* शिर्डी - ७ टक्के
* नांदेड - ८.५ टक्के
* बीड - १० टक्के
* अहमदनगर - ७ टक्के
* माढा - ७.२९ टक्के
* परभणी - ११ टक्के
* लातूर - १३ टकके
* हिंगोली - ९.५ टक्के
* उस्मानाबाद - ९.५ टक्के
* पुणे - ९ टक्के
आजच्या निवडणुकीची वैशिष्ट्ये
* निवडणुकीचा निर्णायक मध्य
* देशात १२ राज्यांमध्ये १२१ जागांसाठी मतदान
* राज्यात दुसऱ्या टप्प्यातील १९ जागांसाठी मतदान
* देशात १,७६२ उमेदवार रिंगणात