गुजरातचा विकास खरा की खोटा?

नरेंद्र मोदी यांनी काम कमी आणि मार्केटिंग जास्त केलं, नरेंद्र मोदी यांनी मार्केटिंगवर दहा हजार कोटी रूपये खर्च केले, असा आरोप तुमच्यावर होतोय, या विषयी काय सांगाल?, असा प्रश्न मोदींनी एएनआयने विचारला.

Updated: Apr 16, 2014, 09:39 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, गांधीनगर
नरेंद्र मोदी यांनी काम कमी आणि मार्केटिंग जास्त केलं, नरेंद्र मोदी यांनी मार्केटिंगवर दहा हजार कोटी रूपये खर्च केले, असा आरोप तुमच्यावर होतोय, या विषयी काय सांगाल?, असा प्रश्न मोदींनी एएनआयने विचारला.
प्रश्नाला उत्तर देतांना मोदी म्हणाले, मार्केटिंगने पाणी, वीज, रस्ते येत नाहीत, मार्केटिंगने पाणी, रस्ते, वीज येत, नाही आम्ही ती प्रत्यक्षात आमच्या कामातून आणली, तेव्हा गुजरातच्या जनतेने आम्हाला निवडून दिल्याचं मोदींनी सांगितलं.
विकासाची कामं डोळ्यांनी पाहिल्यानंतर जग मान्यता मिळते. मार्केटिंगने नाही. मार्केटिंग करून काम होत नाहीत. काम प्रत्यक्षात आली म्हणूनच जनतेने आम्हाला निवडून दिलं, असं नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.