`सबका साथ, सबका विकास` मोदी सरकारचा अॅक्शन प्लान

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त अधिवेशनात अभिभाषण करत आहेत. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषण सुरू आहे. अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणणे, महागाई आणि चलनफुगवट्याचा मुकाबला करणं यासह भाजपाप्रणित एनडीए सरकारच्या प्राधान्यक्रमावर असलेल्या मुद्यांचा समावेश राष्ट्रपतींच्या अभिभाषणात आहे.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Jun 9, 2014, 12:50 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त अधिवेशनात अभिभाषण करत आहेत. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषण सुरू आहे. अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणणे, महागाई आणि चलनफुगवट्याचा मुकाबला करणं यासह भाजपाप्रणित एनडीए सरकारच्या प्राधान्यक्रमावर असलेल्या मुद्यांचा समावेश राष्ट्रपतींच्या अभिभाषणात आहे.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर लोकसभा आणि राज्यसभेची अर्ध्या तासाची स्वतंत्र बैठक होणार असून त्यादरम्यान दोन्ही सभागृहांचे सरचिटणीस मुखर्जी यांच्या भाषणाच्या चर्चा होईल.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणाचे मुद्दे, मोदी सरकारचा Action Plan
• राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला सुरूवात
• सेंट्रल हॉलमध्ये राष्ट्रपतींचं अभिभाषण
• लोकसभेच्या नव्या अध्यक्षांचंही केलं अभिनंदन
• राष्ट्रपतींकडून नवनिर्वाचित सदस्य़ांचं स्वागत
• 16 व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन सुरू
• जनतेची सेवा करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध
• पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरकारच्या कामाचा देतायेत आढावा
• निवडणूका सुरळीत पार पडल्या, राष्ट्रपतींकडून निवडणूक आयोगाचं अभिनंदन
• गरिबी मिटवण्याला प्राध्यान्य देणार
• जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याची वेळ आलीय
• कृषि क्षेतातल्या गुंतवणुकीला सरकार प्रोत्साहन देणार
• नव्या सरकारमध्ये भ्रष्टाचाराला जागा नाही
• `एक भारत, श्रेष्ठ भारत`
• पंचायत राज मजबुत करणं सरकारचं लक्ष्य
• गावं आणि शहरांमधली दरी कमी करणार
• महागाई नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करणार
• देशातील सर्व राज्यांमध्ये IIT आणि IIM
• अनुसुचित जाती जमातींचा विकास गरजेचा, त्यासाठी विशेष योजना
• खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडा क्षेत्रासाठी विशेष योजना
• गावागावांमध्ये रस्ते, वीज, पाणी पोहोचवणार
• वॉटर सिक्युरिटीवर सरकार भर देणार
• कोर्टाचं आधुनिकीकरण करणार
• सर्व महिलांना 33 टक्के आरक्षण देणार
• बेटी बचाओ- बेटी पढाओ योजनेला प्राधान्य
• केंद्र आण राज्य सरकार टीमप्रमाणे काम करतील
• नवं आरोग्य धोरण राबवणार
• पाणी वाचवा, पाणी साठवा
• पशुपालनाला चालना देण्याचे प्रयत्न

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.