www.24taas.com, एएनआय, मंडी
हिमाचल प्रदेशात मंडी इथं व्यास नदीत बोट बुडून 26 विद्यार्थी बुडाल्याची भीती व्यक्त करण्यात येतेय. हे सर्व विद्यार्थी हैदराबादचे आहेत. फोटोग्राफी करण्यासाठी हे विद्यार्थी हिमाचलला गेल्याचं समजतंय.
धरणातून पाणी सोडल्यानं व्यास नदीच्या पाणी पातळीत अचानक वाढ झाल्यामुळं ही घटना घडली. लार्जी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यामुळं नदीची पातळी वाढली. दुर्घटनेनंतर हिमाचल सरकारनं मदतकार्य सुरू केलंय. कोणतीही पूर्वसूचना न देता पाण्याचा विसर्ग केल्यानं ही दुर्घटना झाल्याचं बोललं जातंय.
दरम्यान घटनेनंतर संतप्त नागरीकांनी काहीकाळासाठी राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला होता. आज चंद्राबाबू हिमाचलच्या दौऱ्यावर जाणार आहेत. आतापर्यंत 5 मृतहेद बाहेर काढण्यात आले असून आर्मीकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे.
Have recovered 5 bodies till now,the volume of water is making ops a bit tough-Sanjeev,Sashastra Seema Bal(SSB) pic.twitter.com/rV8ySd2T5U
— ANI (@ANI_news) June 9, 2014
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.