www.24taas.com, झी मीडिया, गुवाहाटी
२०१४च्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात मतदानाला उत्तम प्रतिसाद मिळालाय. त्यामुळं लोकशाहीच्या उत्सवाला दमदार सुरूवात झाल्याचं म्हणता येईल.
आसाममध्ये सुमारे ७५ टक्के तर त्रिपुरात सुमारे ८४ टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झालंय. पहिल्या टप्प्यात आसाममधल्या पाच जागांसाठी तर त्रिपुरात एका जागेसाठी मतदान झालं. दोन्ही राज्यांमध्ये काही तुरळक घटना वगळता मतदान शांततेत पार पडलं.
आसाममध्ये गेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा जास्त मतदान झालंय. गेल्यावेळी आसाममध्ये ६९ टक्के मतदान झालं होतं. पहिल्या टप्प्यात आसाममधल्या अनेक दिग्गजांचं भवितव्य पणाला लागलंय. यात आसामचे मुख्यमंत्री तरूण गोगोई यांचे पुत्र गौरव गोगोई कालियाबोरमधून आपलं नशिब आजमावत आहेत. तसंच दिब्रुगडमधून केंद्रीयमंत्री पवनसिंग घटोवार यांचंही भवितव्य पणाला लागलंय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.