रणसंग्राम २०१४ - पक्षांची सद्यस्थिती

लोकसभेचा रणसंग्राम सुरू झाला आहे, सोळाव्या लोकसभेत विजय मिळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. अशा परिस्थितीत कोणता पक्ष कोणत्या स्थितीत आहे, हे जाणून घेणं महत्वाचं आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Apr 4, 2014, 10:07 PM IST

लोकसभेचा रणसंग्राम सुरू झाला आहे, सोळाव्या लोकसभेत विजय मिळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. अशा परिस्थितीत कोणता पक्ष कोणत्या स्थितीत आहे, हे जाणून घेणं महत्वाचं आहे.
यूपीए
यूपीएमधील काँग्रेस हा महत्वाचा घटक आहे. निवडणुकीआधी काँग्रेस भ्रष्टाचाराच्या आरोपांनी हैराण आहे. भाजप हा विरोधी पक्ष असला, तरी अण्णा हजारेंच्या आंदोलनापासून काँग्रेस पक्ष हा सर्वात जास्त अडचणीत आला आहे.
टूजी, कॉमनवेल्थ गेममधील भ्रष्टाचार, यामुळे जगभरात झालेली देशाची बेआब्रू, कोलगेट स्कॅम, व्हीव्हीआयपी चॉपर यामुळे काँग्रेससह यूपीएची प्रतिमा भारतीय जनतेच्या मनात निश्चितच डागाळली गेली आहे.
मात्र दुसरीकडे काँग्रेसने भ्रष्टाचारावर नियंत्रण मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले आहेत. कारण शेवटच्या टप्प्यात काँग्रेसने अनेक भ्रष्टाचारविरोधील विधेयक पारित केले आहेत. यात लोकपाल आणि व्हिसलब्लोअर संरक्षण विधेयकात सुधारणा केली आहे.
व्हिसलब्लोअर अॅक्टमधील सुधारणा, माहिती अधिकारासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संजीवनी ठरू शकते.
या विधेयकांच्या आधारावरून काँग्रेस सार्वजनिक क्षेत्रातील भ्रष्टाचारावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करत असतांना दिसतंय.
मात्र असं करत असतांन चारा घोटाळा प्रकरणी आरोपी आणि काँग्रेसचे मित्रपक्षाचे अध्यक्ष असलेल्या लालू प्रसाद यादव यांनी काँग्रेसच्य़ा भूमिकेवर बोट ठेवलं आहे.
एनडीए
भाजप मागील दहावर्षापासून सत्तेबाहेर आहे. यूपीए सत्तेबाहेर करण्यासाठी एनडीएने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. भाजपचे लोकसभेचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्यावर फक्त काँग्रेसच नाही तर राहुल गांधी यांनाही लक्ष्य केलं आहे.
भाजपने काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप केले असले, तरी भाजपची प्रतिमा भ्रष्टाचाराच्या बाबतीत मलिन झालेली नाही, असं नाही, कारण दक्षिण भारतातील काँग्रेसचं पहिलं वहिलं सरकारही भ्रष्ट्राचाराच्या मुद्याने डागाळलेलं आहे.
भ्रष्टाचारावरून कर्नाटकचे तत्कालिन मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांना राजीनामा द्यावा लागला आहे. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचं पक्षाकडून आदराने नाव घेतलं जात असलं, तरी या मुख्यमंत्र्यांवरही भ्रष्टाचाराचे आरोप होत असतांना दिसतायत.
तिसरी आघाडी
तिसऱ्या आघाडीमागे डावे पक्ष मुख्यत्वाने उभे आहेत, जेव्हा बहुमतामुळे सरकार पडण्यासारखी परिस्थिती निर्माण होते, अशा काळात डावे पक्ष आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करतात. भ्रष्टाचाराच्या मुद्यांवर तिसऱ्या आघाडीतील पक्षांनी नेहमीच एनडीए आणि यूपीएवर टीका केली आहे.
मात्र तिसऱ्या आघाडीतील डाव्या पक्षांचे मित्र पक्षांवरही भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत, केरळात होत असलेला एसएनसी-लवलीन घोटाळ्याचा आरोप, या वेळी राज्यात एलडीएफ सरकार होतं.
डावी आघाडी
इतरांमध्ये सध्या आम आदमी पक्षाचं नाव घेतलं जात आहे. भ्रष्टाचाराच्या विरोधावरून आम आदमी पक्षाचा उदय झाला आहे. अरविंद केजरीवाल यांच्याकडे या पक्षाची सूत्र आहेत. अण्णा हजारे यांनी अरविंद केजरीवाल यांची सध्या साथ सोडली आहे.
तरीही याआधी अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीचं सरकार दोन महिने चालवलं. अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेस आणि भाजप विरोधात एक नवा पर्याय जनतेला दिला आहे. आपवरही सुरूवातीच्याच काळात भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.