www.24taas.com, मुंबई
मुंबईतल्या सार्वजनिक गणेशोत्सोव मंडळांना रात्री साडेनऊ नंतरच मुर्तीकारांकडून गणेशमूर्ती नेता येणार आहेत. यासंदर्भात वाहतूक पोलिसांनी मुर्तीकारांना नोटीस पाठवून मोठ्या गणेशमूर्ती दिवसा ताब्यात न देण्यास सांगितलंय. या नोटीसीमुळं गणेश मंडळ आणि मूर्तीकारांनी नाराजी व्यक्त केलीय.
मोठ्या गणेशमूर्ती नेल्या जात असताना या परिसरात वाहतुकीची कोंडी होते. यामुळं प्रवाशांना तसंच या परिसरातल्या रूग्णालयात जाणा-या रूग्णांना त्रास होतो. या कारणांचा विचार करुन वाहतूक पोलिसांनी गणेशमूर्ती नेण्यावर वेळेचं बंधन घातलंय. रात्री 9.30 नंतरच गणेशोत्सव मंडळाना गणेशमूर्ती ताब्यात द्या.अशी नोटीसच मूर्तीकारांना वाहतूक पोलिसांनी दिल्या आहेत. मात्र वाहतूक पोलिसांच्या या नोटीसीवर मुर्तीकारांनी नाराजी व्यक्त केलीय.
रस्त्यात खड्डे असतात. कुठे मूर्ती नेताना झाडाच्या फांद्या आडव्या येतात. त्यामुळे रात्रीपेक्षा दिवसा मूर्ती नेणं अधिक सोयिस्कर असल्याचं मत गणेश मंडळांनी व्यक्त केलंय.रात्री दहानंतर लाऊडस्पीकरला बंदी असते. वाहतूक पोलिसांच्या नियमानुसार गणेशमुर्ती ताब्यात घेतल्यास गणेश आगमानची मिरवणूक कशी काढायची असा प्रश्न उपस्थित करण्यात येतोय.