नो सेक्स, प्लीज !

हॉलीवूडने जो मार्ग सोडलाय, तो मार्ग आता बॉलीवूडने निवडलाय..आणि तो मार्ग आहे बोल्ड सीन्सचा..इन्टेमेट सीन्स किंवा सेक्स सीनही त्याला म्हणता येईल...आजपर्यंत बॉलीवूड अर्थात हिंदी सिनेसृष्टीने हॉलीवूडच्या प्रत्येक बाबीची नक्कल केलीय..पण आज बॉलीवूडने वीसवर्षापूर्वींच्या हॉलीवूडची नक्कल करण्यास सुरुवात केलीय. जो ट्रेंड, जो स्टाईल ऑफ सिनेमा हॉलीवूडमध्ये अनेक वर्षांपूर्वी पहायला मिळायचा तोच ट्रेंड आता बॉलीवूडमध्ये दिसू लागलाय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jun 28, 2013, 08:19 AM IST

www.24taas.com,झी मीडिया, मुंबई
हॉलीवूडमधून OUT
बॉलीवूडमध्ये IN
किती दिवस चालणार
SEXवर आधारित चित्रपट?
नो सेक्स, प्लीज !
हॉलीवूडने जो मार्ग सोडलाय...आज तोच मार्ग बॉलीवूडने निवडलाय..नव्हे त्यामार्गावर वाटचाल सुरु केलीय..शृंगारीक दृश्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या हॉलीवूडपटांनी आता सेक्स सीन्सला बाय-बाय करण्याचं ठरवलंय..विशेष म्हणजे बोल्ड सीन नसतांनाही या हॉलीवूडपटांनी बॉक्स ऑफिसवर भरपूर कमाई केलीय..एव्हडंच नव्हे तर पुरस्कारही पटकावले आहेत.
पुरब और पश्चिम या सत्तरच्या दशकातील चित्रपटतून अभिनेता मनोजकुमार यांनी भारतीय संस्कृतीचं गुनगाण केलं होतं..तसेच पाश्चमात्य देश भारतीय संस्कृतीचं अनुकरण करत असल्याचा संदेशही त्यांनी आपल्या सिनेमातून दिला होता..आणि आता तेच सत्यात उतरतांना दिसून येतयं..सेक्स आणि नग्नतेला हॉलवूडने रामराम केलाय..शृंगारीक दृश्यांसाठी प्रसिद्ध असलेले हॉलीवूडपट आता आपली ओळख बदलण्याच्या प्रयत्नात आहेत.
२०१३च्या ऑस्करसाठी नॉमिनेट झालेल्या हॉलीवूडच्या चित्रपटांवर नजर टाकल्यास हे बेस्ट दहा चित्रपट सेक्स आणि नग्नतेपासून खूपच दूर आहेत. आता हॉलीवूडच्या चित्रपटातून आता बोल्ड सीन हद्दपार होवू लागले आहेत..बोल्ड सीनचा मारा असलेल्या हॉलीवूडपटांना बॉक्स ऑफिसवर फारस यश येत नसल्याचं वॉर्नर ब्रदर्सकडून करण्यात आलेल्या सर्वेनुसार दिसून आलंय..हॉलीवूड चित्रपटात आता सेक्स नाही तर सुपर हिरोंची चलती आहे...कमी कपड्यातील हिरो- हिरोईनच्या शृंगारीक दृश्यांना आता बॉक्स ऑफिसवर फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचं चित्र आहे.
चित्रपटातील स्पेशल इफेक्ट्स , कथा, दिग्दर्शक ,अभिनेत्यांचा दमदार अभिनय आणि एक्शन यांना प्रेक्षकांकडून महत्व दिलं जातंय..नुकतेच सुपर हिट झालेल्या हॉलीवूडपटांचा विचार केल्यास त्यामध्ये बोल्ड सीन नसतांनाही या चित्रपटांनी मोठी कमाई केलीय..२०१२च्या हिट चित्रपटांवर नजर टाकल्यास एनिमेटेड तसेच सुपर हिरोच्या चित्रपटांनी जास्त कमाई केल्याचं लक्षात येईल..हे चित्रपट केवळ बॉक्स ऑफिसवरच यशस्वी ठरलेत असं नाही तर हिट सिनेमांनांचा मानही त्यांनी पटकावलाय.
अलिकडच्या काळात हॉलीवूडपटातून सेक्स आऊट झालं असून हॉलीवूड अभिनेत्रींच्यामते आता अश्लिलता मागे पडत चालली आहे..खरं तर हॉ़लीवूड पटातील अभिनेत्रींना एका नग्न दृश्यासाठी किंवा वेगवेगळ्या नग्न पोजसाठी अतिरिक्त पैसे दिले जातात..तसेच त्यांचा रेटही वेगवेगळा असतो..नुकतेच हॉलीवूड अभिनेत्री ऍलिसने स्टार ट्रेक इनटू डार्कनेस या चित्रपटात एक अश्लील सीन केला आहे..पण त्या दृश्यासाठी तिला नंतर पश्चाताप झाला होता..तसेच सोशल नेटवर्किंग साईटवर तिने आपल्या चाहत्यांची माफी मागीतली होती.
बोल्ड सीन असलेले चित्रपट ना कुटुंबासोबत बसून पहाता येतात ना आता नवीन प्रेक्षकवर्गाची त्याला पसंती मिळतेय...सेक्स सीनचा मारा असलेल्या चित्रपटांना १८ वर्षापेक्षा कमी वय असलेला प्रेक्षकवर्ग लाभत नाही तसेच सर्वसामान्य प्रेक्षकही अशा चित्रपटांक़डे पाठ फिरवु लागलाय..अशा पार्श्वभूमीवर आता हॉलीवूडमधून सेक्स आऊट होत असून कथा, दिग्दर्शन आणि अभिनय असलेले चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट होत आहेत. अशा चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळू लागलीय.
एकीकडं हॉलीवूड सेक्स आणि बोल्ड सीनपासून दूर जात असतांना दुसरीकडं बॉलीवूड मात्र असे सीन्स आणि अशाप्रकारचं काम करणा-या अभिनेत्रींचं स्वागत करत आहेत...वास्तवात शृंगारीक दृश्य नसलेले तसेच कौटुंबीक आणि मनोरंजन असलेल्या चित्रपटांना भारतीय प्रेक्षकांनी चांगली दाद दिलीय..पण असं असतानाही बॉलीवूडचे दिग्दर्शक प्रणय दृश्यांची रेलचेल असलेले चित्रपट तयार करण्यास प्राधान्य देत आहेत.

हॉलीवूडने जो मार्ग सोडलाय, तो मार्ग आता बॉलीवूडने निवडलाय..आणि तो मार्ग आहे बोल्ड सीन्सचा..इन्टेमेट सीन्स किंवा सेक्स सीनही त्याला म्हणता येईल...आजपर्यंत बॉलीवूड अर्थात हिंदी सिनेसृष्टीने हॉलीवूडच्या प्रत्येक बाबीची नक्कल केलीय..पण आज बॉलीवूडने वीसवर्षापूर्वींच्या हॉलीवूडची नक्कल करण्यास सुरुवात केलीय. जो ट्रेंड, जो स्टाईल ऑफ सिनेमा हॉलीवूडमध्ये अनेक वर्षांपूर्वी पहायला मिळायचा तोच ट्रेंड आता बॉलीवूडमध्ये दिसू लागलाय. काळानुरुप हॉ़लीवूडमध्ये बदल होत असून एक्स्पोजर आणि सेक्शुअल कंटेंटला पाश्चमात्य फिल्म निर्मात्यांनी रामराम करण्याच ठरवलंय. त्याचा प्रत्यय हॉलीवूडपटातून येवू लागला आहे..सेक्स एडिक्ट व्यक्तीची कथा रुपेरी पडद्यावर मांडतांना एकही सेक्स सीन चित्रीत न करता.
चित्रपट तयार करण्