झी २४ तासच्या दणक्याने जमीन घोटाळा उघडकीस

उस्मानाबाद जिल्ह्यातील स्वाभिमान सबलीकरण योजनेत झालेल्या घोटाळ्याचा झी २४ तासनं पदार्फाश केला आहे. घोटाळा उघ़डकीस आणल्यानंतर जिल्हा प्रशासन खडबड़ून जागं झालं. जिल्हाधिकाऱ्यांनी जमीन घोटाळ्याच्य़ा चौकशीसाठी समिती नेमली आहे.

Updated: Oct 29, 2011, 10:48 AM IST

महेश पोतदार,

झी २४ तास, उस्मानाबाद

उस्मानाबाद जिल्ह्यातील स्वाभिमान सबलीकरण योजनेत झालेल्या घोटाळ्याचा झी २४ तासनं पदार्फाश केला आहे. झी २४ तासनं घोटाळा उघ़डकीस आणल्यानंतर जिल्हा प्रशासन खडबड़ून जागं झालं. जिल्हाधिकाऱ्यांनी जमीन घोटाळ्याच्य़ा चौकशीसाठी समिती नेमली आहे. शिवाय पाच घोटाळेबाजांवर गुन्हाही दाखल केला आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात  स्वाभिमान सबलीकरण योजनेंतर्गंत झालेल्या ९४०एकर जमीन खरेदी घोटाळ्याचा झी २४ तास पदार्फाश केला होता. या योजनेंतर्गत आदिवासी- पारधींसाठी खरेदी केलेली शेकडो एकर जमीन मालकांना अंधारात ठेवून परस्पर खरेदी केल्याचं उघडकीस आलं होतं. यामध्ये सरकारी अधिकारी आणि स्थानिक दलालांनी लाखो रुपये हडपल्याचं स्पष्ट झालं होतं. झी २४ तासनं घोटाळा उघ़डकीस आणल्यानंतर खडबडून जागं झालेल्या जिल्हा प्रशासनानं कारवाईला सुरुवात केलीय. जमीन घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक समिती नेमलीय. शिवाय उपविभागीय अधिकाऱ्यांकडून पूर्ण जमीन खरेदीची चौकशी करण्यात येणार आहे. मोहा इथल्या बनावट जमीन खरेदी प्रकरणात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मात्र या प्रकरणातील संशयित अधिकारी बी. के. गायकवाड यावर मात्र कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.

जमीन घोटाळ्यात जिल्हा प्रशासनानं घोटाळेबाजांवर कारवाई सुरु केलीये. मात्र घोटाळ्यात अडकलेल्या अधिका-यांना पाठिशी घातलं जात असल्यानं निष्पक्ष चौकशी होणार का याबाबत शंका व्यक्त केली जाते आहे.