जमीन घोटाळा

एकनाथ खडसे उद्या ईडीच्या कार्यालयात हजेरी लावणार

भोसरी जमीन (Bhosari MIDC land purchase) घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना ईडीने (ED) समन्स बजावले आहे.  

Jan 14, 2021, 05:57 PM IST

आयआरबीचे वीरेंद्र म्हैसकर यांच्या विरोधात सीबीआयचं आरोपपत्र दाखल

सरकारी जमीन हडपल्याप्रकरणी आयआरबीचे संचालक वीरेंद्र म्हैसकर यांच्या विरोधात सीबीआयनं आरोपपत्र दाखल केलं आहे. वीरेंद्र म्हैसकर आणि इतरांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे सरकारी जमीन हडपल्याची तक्रार सतीश शेट्टींनी केली होती. 

Dec 6, 2017, 08:20 PM IST

जमीन गैरव्यवहार प्रकरण : एकनाथ खडसे यांचे घुमजाव

पुण्यातल्या भोसरी जमीन गैरव्यवहारप्रकरणी माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी घुमजाव केले आहे. चौकशीदरम्यान खडसे यांनी घुमजाव केले आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. विरोधकांच्या निशाण्यावर पुन्हा एकदा खडसे येण्याची शक्यता आहे.

Feb 22, 2017, 01:10 PM IST

जमीन घोटाळा : एकनाथ खडसेंची झोटींग आयोगाकडून चौकशी

एकनाथ खडसेंची झोटींग आयोगाकडून चौकशी

Feb 14, 2017, 02:27 PM IST

वाड्रा यांनी जमीन घोटाळा केल्याचा आरोप

वाड्रा यांनी जमीन घोटाळा केल्याचा आरोप

May 9, 2016, 02:12 PM IST

चुनाभट्टीतल्या झोपडपट्टीत कोट्यावधींचा घोटाळा!

मुंबईच्या चुनाभट्टी इथल्या झोपडपट्टीतील रहिवाशांच्या नावे सरकारकडून घरे मिळवून अपात्र लोकांना भरमसाठ किंमतीत विकल्याचा आणि यामधून कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा आरोप होतोय. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी खेरवाडी पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी तक्रार दाखल केलीय.

Aug 4, 2013, 06:24 PM IST

नाशिकमध्ये करोडोंचे जमीन घोटाळे

नाशिक शहरात शेकडो कोटी रुपयांचे जमीन घोटाळे उघडकीस येत असतांनाच महापालिकेबरोबरच हजारो नागरिकांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय. महापालिकेनं संपादित केलेली जमीन छोटे प्लॉट करून नागरिकांना विकून मूळ मालकांनी कोट्यवधींची माया गोळा केल्याचा स्थानिकांचा आरोप आहे.

Sep 13, 2012, 05:24 PM IST

पवारांच्या घरात आणखी एक जमीन घोटाळा

महार वतनाची जमीन बळकावल्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वहिनी शर्मिला पवार यांच्याविरोधात पुण्यातल्या पौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. जिल्हाधिका-यांची बनावट ऑर्डर तयार करुन ही जमीन बळकावल्याचा आरोप शर्मिला यांच्यावर आहे.

May 24, 2012, 02:50 PM IST

नवा जमीन घोटाळा, पुन्हा पवारांचाच गोतावळा!

केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या कुटुंबियांवर पुन्हा एकदा जमिनीच्या गैरव्यवहाराचा आरोप होतोय. जिल्हाधिका-यांचा बनावट आदेश तयार करून महार वतनाची जमीन लाटल्याचा आरोप शर्मिला पवार यांच्यावर करण्यात आलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भाऊ श्रीनिवास पवार यांच्या शर्मिला पवार या पत्नी आहेत.

May 4, 2012, 07:18 PM IST

खा. सुप्रिया सुळे अडचणीत

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा या गैरव्यवहारात सहभाग असल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्ते रवी ब-हाटे यांनी केलाय. सुप्रिया सुळे यांनी हे आरोप फेटाळलेत. तसेच सुळे यांच्या सिंगापूरच्या नागरिकत्वाविषयी याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. कागदपत्रांचा शोध घेण्यासंदर्भात न्यायालयानं सिंगापूरच्या दूतावासाला विनंती पत्र पाठवलं आहे. त्यामुळे सुळे यांची डोकेदुखी वाढली आहे.

Feb 3, 2012, 08:27 AM IST