टी-२० वर्ल्ड कप : वॉर्मअपमध्ये भारताने इंग्लंडला हरवलं

टी-२० विश्व चषकाच्या दुसऱ्या सराव सामन्यात भारताने इंग्लडला २० धावांनी हरवलं आहे. इंग्लंड विरूद्ध प्रथम फलंदाजी करताना भारताने १७८ धावांचा डोंगर रचला.

Updated: Mar 20, 2014, 07:25 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, ढाका
टी-२० विश्व चषकाच्या दुसऱ्या सराव सामन्यात भारताने इंग्लडला २० धावांनी हरवलं आहे. इंग्लंड विरूद्ध प्रथम फलंदाजी करताना भारताने १७८ धावांचा डोंगर रचला. तुफान फलंदाजी करताना विराट कोहली याने ७४ तर सुरेश रैना यांनी ५४ धावांची खेळी केली.
मात्र इंग्लडला या धावसंख्येचा पाठलाग करतांना ६ विकेटस गमावून 158 धावा केल्या, एमएम अली यांनी सर्वाधिक 46 धावा केल्या.
या आधी इंग्लडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. इंग्लडने सुरूवातीला भारताला ३ धक्के दिले. सहा षटकात भारताचे ३९ धावांवर ३ गडी बाद झाले. रोहित शर्मा ५, शिखर धवन १४ आणि युवराज सिंग हा अवघ्या १ धावावर बाद झाला.
सुरूवातीच्या तीन धक्क्यांनंतर विराट कोहली आणि सुरेश रैना यांनी भारताचा डाव सावरला. दोघांनी ८१ धावांची भागीदारी केली. पंधराव्या षटकात सुरेश रैना झटपट रन्स काढण्याचा नादात झेलबाद झाला. त्यावेळी भारताची स्थिती ४ बाद १२० अशी होती. त्यानंतर कर्णधार धोनी आणि विराटने भारताची धावसंख्या १७८ पर्यंत पोहचवली.
विराट कोहलीने ४८ चेंडूत ८ चौकारांसह ७४ धावा केल्या. सुरेश रैना याने ३१ चेंडूत सहा चौकार आणि २ षटकारांसह ५४ धावा केल्या. महेंद्रसिंग धोनी याने १ चौकार आणि १ षटकारसह २१ धावा केल्या.