www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
आयपीएलमध्ये ४० हजार कोटीचं फिक्सिंग झाल्याचा गौप्यस्फोट दिल्ली पोलिसांनी केलाय. तर ५, ९ आणि १५ मे रोजीचे सामने फिक्स होते. एका ओव्हरमध्ये १४ रन्स देण्यासाठी ६० लाख रूपये फिक्सिंगमध्ये लावले होते, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली.
दिल्ली पोलिसांनी स्पॉट फिक्सिंगप्रकरणी मोठा गौप्यस्फोट केला. भारतीय क्रिकटर आणि राजस्थान रॉयल्सचा खेळाडू एस. श्रीसंत आणि दोन खेळाडू यांचा फिक्सिंगमध्ये हात असल्याचा व्हिडिओ पुरावा सादर केला. दिल्ली पोलीस कमिश्नर नीरज गुप्ता यांनी भरगच्च पत्रकार परिषदेत आयपीएलमधील फिक्सिंगचा पोलखोल केला.
दरम्यान, या फिक्सिंगमागे अंडरवर्ल्डचा हात आहे. त्यांच्याच इशाऱ्यावरून सर्व काही चालत होतं. त्यामुळे आयपीएलमधील ५, ९ आणि १५ रोजीचे सामने फिक्स होते. एका ओव्हरमध्ये १४ रन्स देण्यासाठी ६० लाख रूपये फिक्सिंगमध्ये लावले होते. अंडरवर्ल्डच्या इशाऱ्याने खेळाडून कोर्डवर्डच्या सहाय्याने एकमेकांना इशारे करीत होते. यामध्ये एस. श्रीसंत, अंकीत चव्हाण, अजित चंदेलिया या राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूंचा सहभाग होता.
सामन्याच्यावेळी फिक्सिंगमध्ये अडकलेले खेळाडू कोडचा वापर करीत होते. लॉकेट फिरवणे, घड्याळ दाखविणे, फिल्डींगमध्ये बदल करणे, टी शर्ट खेचने किंवा वरती करणे तसेच रूमाल लावणे आणि न लावणे, शुजची लेस बांधणे आदींच्या इशाऱ्यांने हे फिक्सिंग केले जात होते, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली.
हे पुरावे देताना त्यांनी व्हिडिओ रेकॉर्डींगचे पुरावेच सादर केलेत. सामना सुरू असताना बुकीचे लोक खेळाडूंना त्याबाबत निर्देश देत असत. तर बुधवारी वानखेड़ेवर खेळली गेलेली राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स मॅच ही फिक्स होती, असे दिल्ली पोलीस म्हणालेत.
दिल्ली पोलिसांची पत्रकार परिषद
स्पॉट फिक्सिंग प्रकरणी दिल्ली पोलिसांनी काय सांगितलं..
अंकीतनं रिस्टबँण्ड हलवून दिला बुकींना इशारा
बुकी - खेळाडुंमध्ये झालेल्या संभाषणाची ऑडिओ टेप पोलिसांच्या हाती
खेळा़डूंनी केलं स्पॉट फिक्सिंग, दिल्ली पोलिसांना दाखवली व्हिडिओ
एका ओव्हरसाठी ठरवले होते ६० लाख रुपये
घड्याळ दाखवणं - हा होता कोडवर्ड
एका ओव्हरमध्ये दिले १४ रन, प्रत्येक बॉलमागे लाखो रूपये खेळाडूंना
अजित चंदालिया एका ओव्हरमध्ये १४ रन देण्याचं केलं होतं बुकींना कबूल
दिल्ली पोलिसांनी व्हिडिओ क्लिपद्वारे सादर केले पुरावे
लॉकेट फिरवणं तसंच टी-शर्टवर करून दिले जात होते इशारे
इशाऱ्यावरून केली जात होती फिक्सिंग | अजित चंडालिया इशारा करायला विसरला
मुंबई आणि मोहालीच्या मॅचमध्ये झाली होती फिक्सिंग - पोलीस
तीन खेळाडूंसहित ११ सट्टेबाजांना केली अटक
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.