www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
थप्पडची गुंज
श्रीसंतचे नाव मॅच फिक्सिंगमध्ये आल्यानंतर पुन्हा एकदा आयपीएल आणि वाद हे चव्हाट्यावर आले आहे. हे पहिले प्रकरण नाही की जेव्हा श्रीसंत वादात अडकला आहे. यापूर्वी २००८ मध्ये हा तेज गोलंदाज चर्चित कानाखाली लगावल्याच्या प्रकरणात अडकला होता. श्रीसंतला ऑफ स्पिनर हरभजन सिंगने कानाखाली लगावली होती. त्यानंतर टीव्ही कॅमेऱ्यासमोर रडताना आपण श्रीसंतला पाहिले होते. दरम्यान श्रीसंतने काही दिवसापूर्वी स्पष्ट केले होते, हरभजनने कानाखाली लगावली नव्हती तर कोपरा मारला होता.
महिलेशी गैरवर्तन
ऑस्ट्रेलियाचा ल्यूक पोमरबाक याला २०१२ मध्ये मौर्य शेरटन हॉटेलमध्ये भारतीय मूळच्या व्यक्तीसोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी अटक केले होते. त्याच्या विरोधात आयपीएलचे कलम ३५४ प्रमाणे (महिलांसोबत अभद्र वर्तन), कलम ३५३ नुसार (मारहाण), कलम ४५४ नुसार (जबरदस्तीने प्रवेश) आणि कलम ५११ प्रकरण तक्रार दाखल केली होती.
शाहरुखचा धिंगाणा
गेल्या वर्षी बॉलीवुड स्टार आणि कोलकत्ता नाईट रायडर्सचा मालक शाहरुख खानने वानखेडेच्या सुरक्षा रक्षकासोबत घातलेला वाद त्यामुळे शाहरुखला पाच वर्षांसाठी वानखेडेवर बंदी घातलण्यात आली.
कोच्ची टस्कर्सची मान्यता रद्द
बीसीसीआयच्या कराराचा भंग केल्यामुळे कोच्ची टस्कर्स केरळची मान्यता रद्द करण्यात आली.
स्पॉट फिक्सिंग पाच खेळाडू निलंबित
गेल्या वर्षी पाच खेळाडूंना स्पॉट फिक्सिंग प्रकरणी निलंबित करण्यात आले, या टी. पी. सुधींद्र (डेक्कन चार्जर्स), मोहनीश मिश्रा ( पुणे वॉरियर्स ), अमित यादव आणि शलभ श्रीवास्तव ( किंग्स इलेवन पंजाब ) आणि अभिनव बाली।