बॉलिवूड अॅक्ट्रेसमध्ये सनी लिओन अव्वल

२०१३मध्ये मोस्ट सर्च बॉलिवूड अॅक्ट्रेसमध्ये सनी लिओन अव्वल, बॉलिवूडच्या सुपरस्टार्सना टाकलं अभिनेत्री सनी लिओन पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरलीय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Aug 10, 2013, 12:19 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
२०१३मध्ये मोस्ट सर्च बॉलिवूड अॅक्ट्रेसमध्ये सनी लिओन अव्वल, बॉलिवूडच्या सुपरस्टार्सना टाकलं अभिनेत्री सनी लिओन पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरलीय. तिने काही न्यूड सीन वगैरे तिने दिलेला नाही किंवा कोणत्याही बॉलिवूड अभिनेत्याच्या ती प्रेमात वगैरेही पडलेली नाही.जून २०१३मध्ये नेटवर ऑनलाईन मोस्ट सर्च अभिनेत्री ठरण्याचा मान तिने पटकावलाय.
बॉलिवूडमध्ये अभिनेत्रीमध्ये कायमच नंबर वन कोण याची चढाओढ सुरु असते...मग ती कतरिना कैफ असो...प्रियांका असो. दीपिका असो किंवा करीना ...मात्र या सर्व अभिनेत्री मागे टाकत अभिनेत्री सन्नी लिओन ठरतेय नंबर वन....आत्ता तुम्हीही नक्कीच आर्श्चय चकीत झाला असाल की असा कोणता सिनेमा आहे की ज्यात सन्नी लिओनचं काम अगदी तिला नंबर वन अभिनेत्री ठरवतंय....तर तसा गैरसमज करून घेऊ नका...सनी लिओन नंबर वन ठरतेय मात्र बॉलिवूडची अभिनेत्री म्हणून नव्हे तर मोस्ट सर्च इंडियन सेलिब्रिटी म्हणून तिने हा मान पटकावलाय.
ऑनलाईन तिला सर्च करणारा हा आकडा साधासूधदा नसून चक्क 3. 50 कोटींच्या घरात पोहचलाय...जो आत्तापर्यंत इंडियातील कोणत्याही स्टार्सच्या वाट्याला आलेला नाही. आत्तापर्यतच्या भारतीय स्टार्सची आकडेवारी पाहिली तर ती आघाडीवर असल्याचे दिसते.

कतरिना 1. 85, करीना कपूर 1. 15, सलमान खान 1. 14, ऐश्वर्या बच्चन 0.92, अक्षय कुमार 0.67, दीपिका पदुकोण 0.66, रणबीर कपूर 0.65, आमीर खान 0.59, अनुष्का शर्मा 0.57 ही आकडे वारी पाहिली तर कळतं की सनीची 3. 50 कोटी अशी आकडेवारी आणि कतरिना जरीही दुस-यानंबरवर असली तरीही 1. 85 कोटी आकडेवारी यातही खूपच तफावत आहे.
सनीने बॉलिवूडच्या सुपरस्टार्सना तसेच नंबर वन अभिनेत्रींना मागे टाकत नंबर वनचं फेम आपल्याच नावावर करून घेतलंय. सो अभिनयात जरी आपला जलवा सनी दाखवू शकली नाही तरीही सन्नीचा मोस्ट सर्च अभिनेत्री जलवा कुछ कम नही है.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.