www.24taas.com, मुंबई
बॉलिवूडचा अभिनेता सलमान खानला उपचारासाठी परदेशात जाण्याची परवानगी आणि सवड मिळालीय. नेहमी बीझी असलेलं शेड्युल ‘काळवीट शिकार खटला’ कोर्टात सुरू असलेल्यामुळे जरा आणखीनच बीझी झालं होतं त्यामुळे, आपले उपचारही लांबणीवर पडत होते, असं सलमान म्हणालाय.
‘सेलिब्रिटी क्रिकेट लीग’साठी सलमान शनिवारी कोचीमध्ये उपस्थित होता. यावेळी त्यानं पत्रकारांशीही संवाद साधला. ‘काम अणि न्यायालयात चाललेल्या खटला यांमुळे मला उपचारासाठी परदेशात जाणं, अनेक वेळा टाळावं लागलं. पण, आता मात्र मी परदेशात जाऊ शकेन’ असं त्यानं म्हटलंय.
१९९८ साली ‘हम साथ साथ है’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान काळवीटाची शिकार केल्यानं सलमानवर कोर्टात खटला सुरू आहे. वन्यजीव सुरक्षा अधिनीयमांचं उल्लंघन केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आलाय. सलमान खानला खटल्याबाबत विचारलं त्यानं, खटला न्यायप्रविष्ठ असल्यानं या विषयावर सध्या आपण काहीही बोलू शकत नाही, असं म्हणत गप्प राहणंच पसंत केलं.