www.24taas.com, चेन्नई
सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात आडकलेला विश्वरुपम अखेर चेन्नईत प्रदर्शित झाला आणि या चित्रपटानं पहिल्याच दिवशी तब्बल ५.८१ कोटी रूपयाचा गल्ला गोळा केलाय.
तामिळनाडूत गुरुवारी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला असाच प्रतिसाद मिळाला तर आठवड्याच्या शेवटीपर्यंत हा सिनेमा चांगलीच कमाई करू शकेल, असं जाणकारांचं मत आहे. या चित्रपटाचं लेखन, निर्देशन अभिनेता कमल हसन यानं केलंय. ‘विश्वरुपम’च्या निर्मितीसाठी तब्बल ९५ कोटी रुपये खर्च करण्यात आलेत. तमिळनाडूत एकाच दिवशी ६०० पेक्षा जास्त चित्रपटगृहांत हा सिनेमा प्रदर्शित झाला.
२५ जानेवारी रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार होता परंतू, मुस्लीम संघटनांच्या विरोधामुळे प्रदर्शन लांबणीवर पडलं. वादग्रस्त चित्रिकरुण हटावण्यात आल्यानंतर हा चित्रपट तामिळनाडूमध्ये प्रदर्शित झालाय. हा चित्रपट दहशदवादावर भाष्य करतो. कमल हसन, पूजा कुमार, शेखर कपूर, राहुल बोस या कलाकारांनी या सिनेमात महत्त्वाच्या भूमिका पार पाडल्यात.
‘विश्वरुपम’ हा सिनेमा हिंदीमध्ये १ फेब्रुवारीला प्रदर्शित झाला होता आणि पहिल्याच आठवड्याच्या शेवटी ११.५५ कोटी रुपयाची कमाईही केली होती.