www.24taas.com,झी मीडिया,मुंबई
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शाहरूख खानच्या चेन्नई एक्स्प्रेसला हिरवा कंदील दाखवला. निर्माते रोहित शेट्टी यांनी राज यांची भेट घेतल्यानंतर मनसेचा विरोध मावळला.
मुंबईत कॅमेरामन संजय जाधव यांचा `दुनियादारी` हा मराठी सिनेमा झळकला. सुहास शिरवळकर लिखित `दुनियादारी` ही कादंबरी आजही तरूणांना आपलीशी वाटते. याच कादंबरीवर दुनियादारी हा चित्रपट आहे. या मराठी सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळतोय. मराठीचा मुद्दा हाती घेत मनसेने दुनियादारी सिंगलफेज थिएटरवरून काढला जाऊ नये, असा इशारा थिएटर मालकांना दिला होता. त्यानंतर चित्रपटाचा नवा वाद निर्माण झाला.
चेन्नई एक्स्प्रेस चित्रपटासाठी दुनियादारी या मराठी चित्रपटाचे खेळ रद्द करण्यावरून सुरू झालेल्या वादावर अखेर पडदा पडला आहे. चेन्नई एक्स्प्रेस व दुनियादारी या दोन्ही चित्रपटांच्या निर्मात्यांनी सामोपचाराने वाद मिटवावा असा सल्ला ठाकरे यांनी दिलाय. ९ ऑगस्ट रोजी ईदच्या मुहुर्तावर आता `चेन्नई एक्स्प्रेस` धावणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.