'बेशरम' रणबीर आई-बाबांसोबत दिसणार!

‘दबंग’ नंतर दिग्दर्शक अभिनव कश्यप आता घेऊन येतोय ‘बेशरम’... या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे रणबीर कपूर... या चित्रपटाची खासियत म्हणजे या चित्रपटात रणबीर त्याच्या आई-वडिलांसोबत म्हणजे ऋषी कपूर आणि नितू सिंह यांच्यासोबत दिसणार आहे.

Updated: Aug 1, 2013, 12:02 PM IST

www.24 taas.com झी मिडिया, मुंबई
‘दबंग’ नंतर दिग्दर्शक अभिनव कश्यप आता घेऊन येतोय ‘बेशरम’... या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे रणबीर कपूर... या चित्रपटाची खासियत म्हणजे या चित्रपटात रणबीर त्याच्या आई-वडिलांसोबत म्हणजे ऋषी कपूर आणि नितू सिंह यांच्यासोबत दिसणार आहे.
अभिनव कश्यप यानं या चित्रपटासाठी रणबीरबरोबरच अभिनेता ऋषी कपूर आणि त्यांची पत्नी अभिनेत्री नितू सिंह यांनादेखील आपल्या चित्रपटात सामील करून घेतलंय. अभिनवच्या मते, या चित्रपटासाठी हे स्टार कुटुंब लोकांची उत्सुकता अधिक वाढवण्याचं काम करतील... नव्हे त्यांनी ही उत्सुकता आत्तापासूनच निर्माण केलीय.

ऋषी कपूर आणि नितू सिंह हे दोघेही या चित्रपटात पोलीस आधिकाऱ्यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. अभिनव कश्यप यानं मंगळवारी या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करताना पत्रकारांशी संवाद साधला. तो म्हणतो, ‘मी या चित्रपटासाठी एका वयस्कर अभिनेत्याच्या शोधात होतो. रणबीरशी बोलताना माझ्या लक्षात आलं की, ऋषी कपूर यांनी आपल्या ४० वर्षांच्या करिअरमध्ये पोलिसाची भूमिका केलेली नाही, त्यामुळे मी ऋषी कपूर यांच्यासोबतच नितू यांनाही विचारून टाकलं’
‘बेशरम’ या रोमान्टिक-कॉमेडी चित्रपटात ऋषी कपूर, नितू सिंह आणि रणबीर कपूर पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता आधिकच वाढतेय. हा चित्रपट दोन ऑक्टोबरला चित्रपटगृहात झळकेल.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.