www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
या विकेण्डला तुमच्या भेटीसाठी येत आहेत दोन हिंदी आणि एक मराठी सिनेमा... यामध्ये धकधक गर्ल माधुरी दीक्षितचा बहुप्रतिक्षीत डेढ इश्कियाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. तर 1909 हा मराठी सिनेमाही प्रेक्षकांच्या भेटीला येतोय...
बेगम माधुरीची एक नखरेल आणि तितकीच हटके अदा डेढ इश्कियामध्ये पहायला मिळणारे. इश्कियाच्या या सिक्वलमध्ये नसिरुद्दीन शाह, अर्शद वारसी या जोडीबरोबर माधुरी दीक्षित झळकणार असल्याने प्रेक्षकांनाही या फिल्मबद्दल मोठी उत्सुकता आहे.
स्वतः माधुरीनेही प्रमोशनमध्ये कुठेही कसर ठेवलेली नाही. डेढ गुणा एन्टरटेन्मेंट देऊ, अशी ग्वाही या धकधक गर्लने दिलीये...त्यामुळे चाहत्यांना आता डेढ इश्कियाची ही मिक्स मसाला डिश कशी वाटतेय याची उत्सुकता स्वतः माधुरीलाही आहेच. थोडक्यात काय, नव्या वर्षाची सुरूवात धुमधडाक्यात करण्यासाठी बेगम माधुरी आतुर झालीये...
क्रांतीकारकांचा 1909
मराठीमध्ये अभय कांबळी दिग्दर्शित 1909 हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. क्रांतीकारक अनंत कान्हेरे, कृष्णाजी कर्वे आणि विनायक देशपांडे यांच्या जीवनावर आधारित हा सिनेमा आहे. स्वातंत्र्यासाठी बलिदान देणा-या तीन मराठी तरुणांची ही शौर्यगाथा फिल्मी पडद्यावर येतेय. सिनेमात नव्या कलाकारांची फौज आहे. मात्र नाटक, एकांकिकांमधून आलेल्या या कलाकारांचा अभिनय प्रोमोजमधूनतरी दमदार वाटतोय. आता प्रेक्षक या सिनेमाला कसा प्रतिसाद देतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणारेय...
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.