www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
सोशल मीडियात खोट्या बातम्या कशा आग लावू शकतात किंवा खळबळ माजवू शकतात याचा प्रत्यय आज पाहायला मिळाला. यो यो हनी सिंग यांच्या निधनाची बातमी आगीसारखी पसरली.
सोशल मीडिया वेबसाईटवर आज सकाळी एक फोटो खूप झपाट्याने व्हायरल झाला. त्याल हनी सिंगसारखा दिसणारा तरूण हॉस्पिटलमध्ये बेशुद्ध पडलेला दाखविण्यात आला.
या फोटोसह बातमी देण्यात आली की, हनी सिंग याचा एका रस्ते अपघातात मृत्यू झाला. पण ही बातमी पूर्णपणे खोटी होती. खरं हे आहे की, हनी सिंग पूर्णपणे सुरक्षित आहे. जो फोटो व्हायरल झाला तो हनी सिंगच्या ब्रिक मी बॅक या गाण्यातील आहे.
सध्या हनी सिंग दुबईत असून तो एक बॉक्सिंग लीग लॉन्चिंगच्या कार्यक्रमात आहे. सोशल मीडियावर अफवेचा शिकार होणारा हनी सिंग हा पहिला कलाकार नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.