www.24taas.com, मुंबई
२०१२ मधल्या हिंदी सिनेसृष्टीमध्ये सध्या वेगवेगळ्या अवॉर्ड फंक्शन्सची धूम चालू आहे. पण याच वेळी बॉलिवूडच्या सर्वांत वाईट टॅलेंट्सनासुद्धा ‘सन्मानित’ करणारा ‘घंटा अवॉर्ड्स’ देण्यात आले आहेत.
आश्चर्य म्हणजे यावर्षी बॉलिवूडला १००-१०० कोटींची घसघशीत कमाई करून देणाऱ्या सलमान खानला वाईट अभिनयाबद्दल घंटा अवॉर्ड देण्यात आलं आहे. तर अभिनेत्रींमध्ये सोनाक्षी सिन्हाला २०१३मधील सर्वांत वाईट अभिनेत्री म्हणून ‘घंटा अवॉर्ड’ दिलं जात आहे. याहून हास्यास्पद गोष्ट म्हणजे तुषार कपूरला ‘सेक्सी अवॉर्ड’ मिळाला आहे. तो देखील ‘क्या सुपरकूल है हम’ सिनेमातील लूक्सबद्दल
पाहा २०१३ तील घंटा अवॉर्ड मिळालेल्यांची यादी
सर्वांत वाईट अभिनेता २०१३- सलमान खान (दबंग २, एक था टायगर)
सर्वांत वाईट अभिनेत्री २०१३- सोनाक्षी सिन्हा (दबंग २, जोकर, रावडी राठोड)
सर्वांत वाईट सिनेमा २०१३- सन ऑफ सरदार
सर्वांत वाईट दिग्दर्शक २०१३- राम गोपाळ वर्मा (भूत रिटर्न्स, डिपार्टमेंट)
सर्वांत वाईट गाणं २०१३- पॉ पॉ (सन ऑफ सरदार)
सर्वांत वाईट सिक्वेल २०१३- हाऊसफुल्ल २
सर्वांत वाईट सहाय्यक अभिनेता २०१३- मिथुन चक्रवर्ती (हाऊसफुल्ल २)
सर्वांत वाईट सहाय्यक अभिनेत्री २०१३- सोनम कपूर (प्लेअर्स)
सर्वांत वाईट जोडी २०१३- रजनीश दुग्गल, करिश्मा कपूर (डेंजरस इश्क)
सर्वांत वाईट रिमेक २०१३- एजंट विनोद
सर्वांत वाईट पदार्पण २०१३- सनी लिऑन (जिस्म २)
बरा प्रयत्न!२०१३- ऋतिक रोशन- अग्निपथ (रांगडेपणा दाखवल्याबद्दल)
बरा प्रयत्न!२०१३- सनी लिऑन- जिस्म २ (अंगावर कपडे राहू दिल्याबद्दल)
बरा प्रयत्न! २०१३- तुषार कपूर- क्या सुपरकूल है हम (अंगावरचे कपडे काढल्याबद्दल)
बरा प्रयत्न! २०१३- शिरीष कुंदर- जोकर (साय-फाय सिनेमा बनवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल)
WTF Was That? (काय भंकस होती ही) – ‘जब तक है जान’मधील येशू ख्रिस्तासमोरचा रोमँटिक सीन आणि राज ३ मधील भूत मोबाइल वापरतो तो सीन