पाहा ट्रेलर: सोनम-आयुष्मानचा `बेवकूफियां`

अभिनेत्री सोनम कपूर आणि आयुष्मान खुराणा यांचा `बेवकूफियां` चित्रपटाचा हॉट ट्रेलर नुकताच लॉन्च झालाय. या चित्रपटात पहिल्यांदाच सोनम बिकीनीमध्ये दिसणार आहे. आयुष्मानसोबत यात तिचे हॉट लिप लॉक सिनही आहेत. हा चित्रपट १४ मार्चला रिलीज होणार आहे.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Feb 7, 2014, 10:47 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
अभिनेत्री सोनम कपूर आणि आयुष्मान खुराणा यांचा `बेवकूफियां` चित्रपटाचा हॉट ट्रेलर नुकताच लॉन्च झालाय. या चित्रपटात पहिल्यांदाच सोनम बिकीनीमध्ये दिसणार आहे. आयुष्मानसोबत यात तिचे हॉट लिप लॉक सिनही आहेत. हा चित्रपट १४ मार्चला रिलीज होणार आहे.
आदित्य चोप्रा निर्मित `बेवकूफियां` या चित्रपटात सोनमच्या वडिलांच्या भूमिकेत अभिनेता ऋषी कपूर दिसेल. चित्रपटाचं दिग्दर्शन नुपूर अष्ठानानं केलंय. यापूर्वी तिनं `मुझसे फ्रेंडशीप करोगे` हा चित्रपट केला होता.
एक सुखी प्रेमी युगुल असलेले सोनम (मायरा)-आयुष्मान (मोहित) च्या आयुष्यात मायराचे वडिल व्ही. के. सेहगल कसे व्हिलन बनून येतात. मग वडिलांना खूश करण्यात दोघांची कशी तारांबळ उडते, हे या चित्रपटात दाखवण्यात आलंय.
पाहा ट्रेलर

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.