मुंबई ३.५ लाखांपेक्षा जास्त घरे वापराविना, ग्राहक नसल्याने साचलेय धूळ
प्रत्येकालाच स्वतःचं घरं हवं असतं... पण गेल्या काही वर्षांत घरांच्या किंमती एवढ्या वाढल्यात की, घरं विकत घेणं परवडेनासं झालंय. त्यामुळंच मुंबई महानगर प्रदेशात तब्बल साडेतीन लाखांहून अधिक घरं ग्राहकांअभावी पडून आहेत.
खाशाबा जाधवांच्या गावातही एक दंगल सुरु...
आर्वीत मुलींची कुस्तीत दमदार कामगिरी झालेय. अभिनेताआमिर खानच्या दंगल सिनेमानंतर मुली लाल मातीतल्या कुस्तीचे धडे गिरवत आहेत. २२ मुलींनी राष्ट्रीय आणि राज्यस्तरावर बाजी मारलेय.
अभयरण्यासाठी गाव उठवलं...पण या कुटुंबाचे पुनर्वसन कधी?
चांदोली अभयारण्यासाठी संगमेश्वर तालुक्यातील गोठणे गाव त्या ठिकाणाहून उठवण्यात आलं व त्याच गावाचं पुनर्वसन हातीव येथे करण्यात आले आहे. याच अभयरण्यासाठी रघुनाथ गणपत पवार यांच्या कुटुंबियांची जमीन गेली खरी पण अद्यापही या कुटुंबाचं पुनर्वसन झालेलं नाही.
जयंती विशेष : 'कथ्थक क्विन' सितारा देवी
गुगलने डूडल बनवून 'कथ्थक क्वीन' सितारा देवींना वाहिली श्रद्धांजली
पालिकेच्या दोन शाळा खासगी कंपनीला आंदण देण्याचा घाट
महापालिकेनं त्यांच्या दोन शाळा खासगी कंपनीला देण्याचा घाट घातलाय. जुनाट झालेल्या शाळा आणि तिजोरीत खडखडाट असल्याचं कारण देत औरंगाबाद महापालिकेनं हा खटाटोप चालवलाय... काय आहे हा सगळा प्रकार, पाहूयात हा रिपोर्ट...
आता उंदीर खरेदी घोटाळा, एक उंदीर १३८ रुपयांना
तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये जेवायला गेला तर राईस प्लेटचा खर्च किती येतो 50 रुपये फार फार तर 60 रुपये. पण पिंपरीमध्ये मात्र माणसाच्या जेवणापेक्षा उंदराची किंमत जास्त आहे...! इथं सापाला खायला लागणारा एक उंदीर तब्बल 138 रुपयांना खरेदी केला जातो! काय आहे हा प्रकार पाहुयात एक रिपोर्ट
नोटबंदीची वर्षपूर्ती, क्रेडीट कार्डचा वापर वाढला
देशात खळबळ उडवून देणाऱ्या आणि सर्वसामान्य नागरिकांना बॅंकांच्या दारात रांगेत उभे करणाऱ्या नोटबंदीच्या निर्णयाला एक वर्ष नुकतेच पूर्ण झाले. या एक वर्षात अर्थव्यवस्थेत अनेक घडामोडी घडल्या. या घडामोडींवर टाकलेला हा अल्पसा कटाक्ष...
नियम धाब्यावर बसवून तोट्यातील कंपन्यांना मुंबई बॅंकेचा कर्जपुरवठा
डबघाईला आलेल्या साखर कारखान्यांपाठोपाठ आता तोट्यातील कंपन्यांनाही नियम धाब्यावर बसवून कर्जपुरवठा करण्याचा सपाटा मुंबै बँकेने सुरू केलाय.
व्यक्तिविशेष : आशिष नेहरा मैदानावरचा आणि मैदना बाहेरचासुद्धा...
फिरोजशहा कोटला मैदान आणि क्रिकेटप्रेमीसुद्धा आज एका महत्त्वपूर्ण क्षणाचे साक्षिदार ठरत आहे. कारण, एक जिंदादील क्रिकेटपटू आज आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीतून निवृत्ती घेत आहे. आशीष नेहरा असे या क्रिकेटपटूचे नाव. या महत्त्वपूर्ण क्षणी नेहराच्या खास चाहत्यांसाठी त्याच्या गुणवैशिष्ट्यांवर टाकलेला हा कटाक्ष...
पुण्यात भरतो माहिती अधिकार कट्टा
कट्टा म्हटलं की आपल्याला आठवतो मित्र मंडळींचा गप्पा मारण्याचा कट्टा... पुण्यात मात्र एक वेगळाच कट्टा भरतो. कोणता आहे हा कट्टा आणि काय आहे त्याचं वैशिष्ट्य.
एकेकाळचा स्टार क्रिकेटपटू आज चालवतोय ऑटो रिक्षा
एकेकाळचा स्टार क्रिकेटपटू पोटासाठी म्हशी राखत असल्याची बातमी यापूर्वी आपण वाचली असेल. आता आणखी एका खेळाडूबाबत अशीच बातमी आली आहे. एकेकाळी लोकप्रिय असलेला हा क्रिकेटपटू आज पोटासाठी चक्क ऑटो रिक्षा चालवून आणि टेलरींगचा व्यवसाय करून पोट भरतो आहे.
एक रस्ता गेला चोरीला, झी २४ तासचा स्पेशल रिपोर्ट
काही वर्षांपूर्वी एक टॉयलेट चोरीला गेले होते. आता त्याच पिंपरी चिंचवडमध्ये एक रस्ता चोरीला गेलाय. विश्वास बसत नाही ना पण हे घडलंय. हा स्पेशल रिपोर्ट...
मुंबईकर तरूणांनी लंडनमध्ये विकले वडापाव, कमावले ४.३९ कोटी रूपये
जेव्हा परतीचे दोर कापले जातात तेव्हा, लढण्याला पर्याय नसतो. जीवावर उदार होऊन केलेल्या अशा लढाईत अपरंपार मेहनत, जीद्द आणि चिकाटीची कसोटी लागते. पण, या संघर्षाचा होणारा शेवटही गोड ठरतो. मुंबईतील दोन तरूणांबाबतही असेच घडले. या पठ्ठ्यांनी सातासमुद्रापार असलेल्या लंडनमध्ये केवळ वडापाव विकून तब्बल ४.३९ कोटी रूपये कमावले आहेत.
अन पवार साहेब वानखेडे स्टेडियम मध्ये अचानक अवतरतात तेव्हा !!!!
वानखेडे स्टेडियमवर काल भारत विरुद्ध न्यूझीलंड क्रिकेट संघात एकदिवसीय सामना सुरु होता...या सामन्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी MCA अध्यक्ष शरद पवार यांनी अचानक उपस्थिती लावून या खेळातून अजून आपण निवृत्ती घेतली नसल्याचंच जणू सूचित केलं...
एकेकाळी सायकलसाठीही नव्हते पैसै आज आहेत Jet airwaysचे फाऊंडर
विमानसेवा पुरवणारी जेट एअरवेज ही कंपनी तर तुम्हाला माहितच असेल. पण, या कंपनीच्या संस्थापकाबद्धल कदाचित खूपच कमी लोकांना माहिती असेल. नरेश गोयल हे या कंपनीचे चेअरमन. जे एक सक्सेस व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाते. एकेकाळी सायकल खरेदी खरण्यासाठीही पैसे नसलेला हा माणूस आज एका विमान कंपनीचा मालक आहे. जाणून घेऊया या व्यक्तिमत्वाबद्धल...
कोकणचे कास पठार फुलले
कोकणाला विस्तीर्ण अशी समुद्रकिनारपट्टी लाभली आहे. पुरातन मंदिरे आणि स्वच्छ समुद्रकिनाऱ्यांमुळे पर्यटकांची कायमच पसंती रत्नागिरीला असते. आता इथली कास पुष्पे रत्नागिरीच्या निसर्गसौंदर्यात अधिक भर घालत आहेत.
'जीएसटी'चा हॉटेल व्यावसायिकांवर कसा परिणाम झालाय? पाहा...
सध्याच्या बदलत्या जीवन शैलीमुळे 'हॉटेलिंग' ही चैन नसून गरज बनत चालली आहे. मात्र, लागू झालेल्या जीएसटीमुळे ग्राहकांसह हॉटेल व्यावसायिकांनाही याची चांगलीच झळ पोहोचतेय. यामुळे हेच का अच्छे दिन? असा सवाल, हॉटेल व्यावसायिक उपस्थित करु लागले आहेत.
मुंबईत चिमुरड्यांच्या खरेदी - विक्रीचा पर्दाफाश
मुंबईत कोणत्याही वस्तूची खरेदी - विक्री होऊ शकते, हे खरं असलं तरी मुंबईत चक्क लहान मुलांच्या खरेदी - विक्रीचा धंदा होत असल्याचं उघड झालंय.
दुर्गेच्या लेकीची यशोगाथा : रेश्मा खातूंची जिद्द
प्रसिद्ध मूर्तीकार विजय खातू यांचं गणेशोत्सवाआधी निधन झालं. त्यामुळे शेकडो गणेश मुर्ती आणि नवरात्रीसाठी देवीच्या मूर्ती तयार करण्याचे काम अपूर्णच राहिलं होतं. मात्र दु:ख बाजूला सारत विजय खातू यांच्या लेकीनं त्यांच्या निधनाच्या दुस-याच दिवशी कारखान्याची जबाबदारी खंबीरपणे स्वीकारली. 'दुर्गे दुर्गट भारी' सदरात पाहुयात रेश्मा खातू यांच्या जिद्दीची कहाणी...
गणपती विसर्जन तलावात, पाण्यातील ऑक्सिजन पातळीत मोठी घट
गणपती विसर्जनानंतर नागपुरातील तलावाच्या पाण्यातील ऑक्सिजनची पातळी कमालीची घसरली आहे. ग्रीन व्हिजिल फाऊंडेशन या संस्थेने केलेल्या तपासणीत हे वास्तव समोर आले आहे.