सलमान भेटीनंतर आमीरला 'सत्यमेव जयते'वरून सवाल

आमीर खानचा 'सत्यमेव जयते' हा रियालिटी शो चांगलाच गाजला, सामाजिक संदेश देणारा हा कार्यक्रम होता, अनेक सामाजिक विषय  'सत्यमेव जयते'मध्ये हाताळण्यात आले होते. यात दारूचं व्यसन ते रस्ते अपघात असे विषय सुंदर आणि कलात्मक पद्धतीने मांडण्यात आले होते.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: May 7, 2015, 08:39 PM IST
सलमान भेटीनंतर आमीरला 'सत्यमेव जयते'वरून सवाल title=

मुंबई : (जयवंत पाटील, झी २४ तास) आमीर खानचा 'सत्यमेव जयते' हा रियालिटी शो चांगलाच गाजला, सामाजिक संदेश देणारा हा कार्यक्रम होता, अनेक सामाजिक विषय  'सत्यमेव जयते'मध्ये हाताळण्यात आले होते. यात दारूचं व्यसन ते रस्ते अपघात असे विषय सुंदर आणि कलात्मक पद्धतीने मांडण्यात आले होते.

या कार्यक्रमाकडे कुणीही आमीर खानचा चित्रपट 'अंदाज अपना-अपना', 'दिल', 'लगान', 'रंगे दे बसंती', थ्री इडियट, किंवा आताचा 'धूम ३' यासारखं पाहिलं नव्हतं, कारण चित्रपट म्हणजे मनोरंजन. मात्र सत्यमेव जयते याला सामाजिक दृष्टीकोनाचा आधार होता, लोकांच्या भावना या कार्यक्रमाशी जुळल्या होत्या, यातून अनेकांना जीवनाकडे पाहण्याचा नवा दृष्टीकोन मिळाला होता, चित्रपटातून असं फार कमी होत असावं, याहूनही एवढं मोठं, प्रचंड काम 'सत्यमेव जयते'ने केलं, यामुळे आमीर खानला लाखो लोकांच्या मनात मानाचं स्थान मिळालं.

मात्र एक अनपेक्षित गोष्ट घडली, सलमानच्या शिक्षेची सुनावणी झाली, यानंतर सलमानच्या घरी बॉलीवूडचे अनेक दिग्गज गेले, आमीर जाईल असं कुणाला वाटलं नव्हतं, पण आमीर थेट सलमानच्या घरी गेला. ही आमीरसाठी अत्यंत खासगी बाब असू शकते, किंवा आहे.

सलमानसाठी हा कठीण काळ असेल, तो प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतो, मित्र म्हणून सर्वच मागे उभं राहतात असं नाही, संकट काळी उभं राहिलंच पाहिजे. पण आमीरच्या अनेक भाबड्या फॅन्सना हे कसं समजणार, आमीर त्यांना आता हे कसं सांगणार..

आमीर खानचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. आमीर खान नाहक कोणत्याही वादंगात नसतो, पण आमीर सलमानच्या घरी गेल्यानंतर मला सत्यमेव जयते सुरू होण्याआधी आमीर जे बोलायचा त्या ओळी आठवल्या, त्या हिंदीत असल्या तरी, त्या आज आठवल्या तर आमीरचा मनातील चेहरा अधिक फिका पडत जातो.

सत्यमेव जयते सुरू होण्याआधी आमीर खान म्हणायचा.... (हिन्दीत)

१) "दोस्तो हिंदुस्तान का एक नागरिक होने के हैसियत से,  ये कार्यक्रम मेरी सामाजिक जिम्मेदारी की एक विनम्र कोशीश है. मै अपने दर्शकोंको यह यकिन दिलाना चाहता हूँ, के किसीभी इन्सान को बदनाम करना, किसी के जज्बात को ठेस पहुंचाना, या किसी के उँपर कोई फैसला सुनाना, ये मेरा इरादा नही है.

२) "आज हमारे समाज के सामने कई ऐसे मुद्दे खडे है, जिनसे लढनें के बजाए कभी-कभी हम उनपर पडदा डालनें की कोशिश करते है. इससे गुनाह करने वालों को और शह मिलती है, और उनके हौसले और भी बुलंद हो जाते है,  मै सिर्फ यही चाहता हूँ के, हम इन मुद्दोंपर हम खुलकर चर्चा करे, उनका सामना करे, ताकें हम इन समस्याओं का हल ढूंढ सकें".

३) "इस बात के मद्देनजर, मै अपने दर्शकों को मै बताना चाहता हूँ के, इस प्रोग्राम के कुछ हिस्से कभी-कभी बहोंत संवेदनशील हो सकते है,  इसलिए आप खुद अपने विवेक और समझ से निर्णय लिजिए".

हे आठवल्यानंतर माझ्याही मनात प्रश्न उभे राहिले ते आमीर खानसाठी, आमीर हा प्रश्न विचारून आम्हाला कुणालाही बदनाम, किंवा कुणाच्या भावनांना ठेच पोहोचवायची नाहीय, अथवा यावर निर्णय द्यायचा नाहीय.

पण वर दिलेल्या नंबर दोनच्या पॅसेजमध्ये तुम्ही जे म्हटलंय,  कधी-कधी आपण सामाजिक मुद्यांशी लढण्याऐवजी, त्याच्यावर पडदा टाकतो, यामुळे गुन्हेगारांना शह मिळतो, आणि त्यामुळे त्यांची हिंमत आणखी वाढत जाते, मजबूत होते. यावर मोकळेपणाने चर्चा व्हावी, कारण या समस्यांवर आपल्याला उपाय शोधता येईल.

पण आमीर आपण आज सलमानची भेट घेतली, त्यानंतर तुमच्या लाखों चाहत्यांच्या मनात काय प्रश्न निर्माण झाले असतील, याची तुम्ही कल्पना केली आहे का?

चार भिंतीत तुम्ही सलमानला चांगला सल्ला दिलाही असेल. पण हा प्रकार हिंमत वाढवण्यासारखा आहे, असं लाखो भाबळ्या प्रेक्षकांना वाटलं नसेल का?, आणि सत्यमेव जयते हा सामाजिक समस्यांवर प्रकाश टाकणारा शो नव्हता, तर हे नुसतं मनोरंजन होतं. सिनेमा पाहिला, टाळ्या वाजवल्या, पोटभर हसलो, चान्स पाहून शिटी मारली, सिनेमा संपला. त्या प्रमाणे 'सत्यमेव जयते' आणि तुमची त्यातील भूमिका होती का?

कारण तुमच्या हा भेटीमुळे सत्यमेव जयतेची ही वाक्य विरोधाभासी वाटायला लागतात, ती वाक्य प्रश्न उपस्थित करतात.

तिसऱ्या पॅसेजमध्ये तुम्ही म्हटलं, प्रेक्षकांना मी सांगू इच्छीतो, या कार्यक्रमातील काही दृश्य-भाग संवेदनशील असू शकतात, आपण स्वत: आपल्या विवेक आणि समजुतीने निर्णय घ्या, आमीर तुमची प्रत्येक गोष्ट तुमच्यासाठी खासगी असेल, मात्र जी सार्वजनिक स्वरूपात पुढे येते, प्रेक्षकांना दिसते, ती संवेदनशील असू शकते, यावर आपणही विवेक आणि समजुतीने निर्णय घ्याल ही अपेक्षा!

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.